Lokmat Sakhi >Social Viral > गॅस लवकर संपतो? बर्नर ३ गोष्टींनी मिनिटात स्वच्छ करा; सिलेंडर लवकर संपणारच नाही..

गॅस लवकर संपतो? बर्नर ३ गोष्टींनी मिनिटात स्वच्छ करा; सिलेंडर लवकर संपणारच नाही..

How to clean gas burner at home | gas burner cleaning video : गॅस बर्नर साफ करण्याच्या काही सोप्या ट्रिक्स माहित करून घ्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2024 07:43 PM2024-08-18T19:43:41+5:302024-08-18T19:44:42+5:30

How to clean gas burner at home | gas burner cleaning video : गॅस बर्नर साफ करण्याच्या काही सोप्या ट्रिक्स माहित करून घ्या..

How to clean gas burner at home | gas burner cleaning video | गॅस लवकर संपतो? बर्नर ३ गोष्टींनी मिनिटात स्वच्छ करा; सिलेंडर लवकर संपणारच नाही..

गॅस लवकर संपतो? बर्नर ३ गोष्टींनी मिनिटात स्वच्छ करा; सिलेंडर लवकर संपणारच नाही..

स्वयंपाकासाठी आपण दररोज गॅस शेगडीचा वापर करतो (Gas burner). स्वयंपाक झाल्यावर आपण दररोज गॅसही स्वच्छ करतो. पण गॅस बर्नर साफ करायला विसरून जातो. अनेकदा गॅस लवकर संपतो किंवा गॅस ठरावविक वेळेपर्यंत पुरत नाही (Kitchen Hacks). गॅस लवकर संपण्याची अनेक कारणं असू शकतात (Cleaning Tips). त्यातील एक कारण म्हणजे गॅस बर्नर अस्वच्छ असणे.

बर्नर नियमित स्वच्छ न केल्यास त्यात घाण जमा होत जाते. ज्यामुळे बर्नर व्यवस्थित काम करत नाही, ज्यामुळे गॅस वाया जातो आणि स्वयंपाकही वेळेवर होत नाही. त्यामुळे वेळेत बर्नर स्वच्छ करणं गरजेचं आहे. जर बर्नरचा काळेपणा घासूनही दूर होत नसेल तर, ३ गोष्टींनी बर्नर स्वच्छ करा. मिनिटात बर्नर क्लिन होईल(How to clean gas burner at home | gas burner cleaning video).

बर्नरचा काळेपणा घालवण्यासाठी उपाय

डिशवॉशिंग लिक्विड

डिशवॉशिंग लिक्विडने आपण गॅस बर्नर स्वच्छ करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये एक चमचा डिशवॉशिंग लिक्विड घ्या. त्यात एक ग्लास कोमट पाणी घालून मिक्स करा. कोमट पाण्यात बर्नर भिजत ठेवा. काही वेळानंतर स्क्रबरने बर्नर घासून काढा. काही मिनिटांतच बर्नरवर जमा झालेली घाण आणि काळेपणा लगेच निघून जाईल.

शाहरुख खान रोज फक्त ४ -५ तासच झोपतो अशी चर्चा, आरोग्यासाठी कमी झोप त्रासदायक की..

लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा

बर्नर फार काळाकुट्ट झाला असेल तर, लिंबाचा रस आणि बेकिंग सोड्याचा वापर करून पाहा. एका बाऊलमध्ये एक ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात एक चमचा डिर्टेजंट आणि डिशवॉश लिक्विड घालून मिक्स करा. नंतर त्यात एक चमचा लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा घालून मिक्स करा. त्यात बर्नर २० मिनिटांसाठी भिजत ठेवा. नंतर जुन्या ब्रशने बर्नर घासून काढा. बर्नर मिनिटात चमकेल.

मेहेंदीचा रंग फिकट - डिझाईनही जमत नाही? ४ ट्रेण्डी सोप्या डिझाईन्स; हात दिसतील सुंदर

व्हिनेगर

ऍपल सायडर व्हिनेगरनेही आपण गॅस बर्नर चमकवू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये ऍपल सायडर व्हिनेगर घ्या. त्यात बर्नर भिजत ठेवा. १५ मिनिटांनंतर बर्नर काढून त्यावर लिंबू आणि बेकिंग सोडा लावा आणि नंतर टूथब्रशने बर्नर घासून स्वच्छ करा. यामुळे बर्नरचा काळेपणा दूर होईल.

Web Title: How to clean gas burner at home | gas burner cleaning video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.