Lokmat Sakhi >Social Viral > Cleaning Hacks : फक्त १० रूपयात स्वच्छ करा काळं पडलेलं गॅस बर्नर; १ उपाय, किचन दिसेल स्वच्छ

Cleaning Hacks : फक्त १० रूपयात स्वच्छ करा काळं पडलेलं गॅस बर्नर; १ उपाय, किचन दिसेल स्वच्छ

How to Clean Gas Burner Easily at Home : बेकिंग सोड्याचा वापर करून कमीत कमी वेळात गॅसवर साचलेला मळ, घाण निघून ते स्वच्छ दिसू लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 04:22 PM2022-06-16T16:22:03+5:302022-06-16T16:43:02+5:30

How to Clean Gas Burner Easily at Home : बेकिंग सोड्याचा वापर करून कमीत कमी वेळात गॅसवर साचलेला मळ, घाण निघून ते स्वच्छ दिसू लागेल.

How to Clean Gas Burner Easily at Home : How to clean gas burner and stove top easily | Cleaning Hacks : फक्त १० रूपयात स्वच्छ करा काळं पडलेलं गॅस बर्नर; १ उपाय, किचन दिसेल स्वच्छ

Cleaning Hacks : फक्त १० रूपयात स्वच्छ करा काळं पडलेलं गॅस बर्नर; १ उपाय, किचन दिसेल स्वच्छ

स्वयंपाकघर स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे कारण ते स्वच्छ न केल्यास अन्नही दूषित होते. पण स्वयंपाकघर साफ करणं हे फक्त भांडी आणि भिंतींपुरतं नाही. गॅसओट्यापासून फरशीपर्यंत सर्व काही स्वच्छ करावं लागतं. विशेषतः गॅस पूर्णपणे स्वच्छ केला पाहिजे. मात्र, घरात असलेला गॅस दिवसातून किमान २-३ वेळा स्वच्छ करावाच लागतो. (Home Cleaning Hacks) 

स्त्रिया अनेकदा फक्त गॅसचे बाह्य भाग स्वच्छ करतात. पण बर्नर साफ करायला विसरतात. दररोज बर्नर साफ करणे शक्य नाही. या कारणामुळे बर्नर काळा होऊ लागतो. यासोबतच त्याच्या छिद्रांमध्ये घाणही साचते. त्यामुळे गॅस बर्नरमधून बाहेर पडणारी आचही कमी होते. या परिस्थितीत, स्त्रिया अनेकदा नवीन बर्नर खरेदी करतात. (What is the easiest way to clean gas burners)

नळातून कमी वेगानं पाणी येतं? ४ ट्रिक्स वापरा, प्लंबरला न बोलावताच पाण्याचा वेग वाढेल

तुम्ही फक्त 10 रुपयांमध्ये गॅस बर्नर साफ करू शकाल. मग तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. बेकिंग सोड्याचा वापर करून कमीत कमी वेळात गॅसवर साचलेला मळ, घाण निघून ते स्वच्छ दिसू लागेल. (How to clean gas burner)

बेकिंग सोडा का वापरावा?

बेकिंग सोडा वापरून तुम्ही घर स्वच्छ करू शकता. तसेच, ते गलिच्छ आणि डाग असलेल्या गोष्टी चमकवू शकते. बेकिंग सोडामध्ये सोडियम बायकार्बोनेट, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटीसेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे त्याच्या मदतीने साफसफाई सहज करता येते. (

अर्धा लिंबू, बेकिंग सोडा, गरम पाणी, डिश वॉश हे साहित्य सर्व प्रथम गोळा करा. यानंतर बर्नर गरम पाण्यात ठेवा. आधी पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्या. नंतर हळूहळू बेकिंग सोडा घाला. हे सर्व एकाच वेळी ठेवू नका. यामुळे प्रभाव कमी होईल. आता या मिश्रणात बर्नर साधारण २ तास भिजवू द्या. यानंतर तुम्हाला दिसेल की बर्नर काही प्रमाणात साफ झाला आहे. नंतर डिश वॉशने बर्नर पूर्णपणे घासून घ्या.  त्यानंतर बर्नर स्वच्छ पाण्याने धुवा. या उपायानं तुमचा गॅस बर्नर नेहमी चमकदार दिसेल. (How to clean gas burner and stove top easily)

घरातल्या तुटलेल्या फरश्या रिपेअर करण्यासाठी ३ ट्रिक्स वापरा; घर नेहमी दिसेल नीटनेटकं

या गोष्टींची काळजी घ्या

१) जर तुम्हाला गॅस बर्नर काळा होऊ नये असे वाटत असेल तर त्यासाठी दररोज गॅस पूर्णपणे स्वच्छ करा. आठवड्यातून एकदा बर्नरची खोल साफसफाई करा. यामुळे बर्नरमध्ये साचलेली घाण साफ होईल.

२) अनेकदा स्वयंपाक करताना काहीतरी गॅसवर पडते. जसे चहा, कॉफी, दूध इ. अशावेळी आपण ताबडतोब बर्नर साफ करावा. आपण असे न केल्यास बर्नर काळा होईल. नंतर ते साफ करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. 

३) वांग्यासारखी कोणतीही भाजी, पापड भाजताना नेहमी जाळी वापरावी. यामुळे गॅस बर्नर काळा होणार नाही.

Web Title: How to Clean Gas Burner Easily at Home : How to clean gas burner and stove top easily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.