Lokmat Sakhi >Social Viral > बर्नर अर्धवटच पेटते? फक्त १ लिंबू आणि १० रुपये खर्चात बर्नर होईल चकाचक, स्वयंपाक झटपट

बर्नर अर्धवटच पेटते? फक्त १ लिंबू आणि १० रुपये खर्चात बर्नर होईल चकाचक, स्वयंपाक झटपट

How to clean gas burners and glass cooktops : गॅसचे बर्नर काळे पडले असेल तर, एकदा लिंबू आणि कोमट पाण्याने स्वच्छ करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2024 10:05 AM2024-04-04T10:05:30+5:302024-04-04T10:10:01+5:30

How to clean gas burners and glass cooktops : गॅसचे बर्नर काळे पडले असेल तर, एकदा लिंबू आणि कोमट पाण्याने स्वच्छ करून पाहा..

How to clean gas burners and glass cooktops | बर्नर अर्धवटच पेटते? फक्त १ लिंबू आणि १० रुपये खर्चात बर्नर होईल चकाचक, स्वयंपाक झटपट

बर्नर अर्धवटच पेटते? फक्त १ लिंबू आणि १० रुपये खर्चात बर्नर होईल चकाचक, स्वयंपाक झटपट

स्वयंपाक करताना अडचण मधेच आली की, चिडचिड होते. आता अडचणी हे अनेक प्रकारच्या असू शकतात. कधी सिलेंडर संपतो, तर कधी बर्नर नीट चालत नाही. बऱ्याचदा शेगडी व्यवस्थित असते (Gas Burner). पण बर्नरच्या छिद्रांमध्ये घाण साचल्यामुळे गॅस व्यवस्थित पेटत नाही. गॅस व्यवस्थित पेटत नसेल तर, आपण मॅकेनिकला बोलावून शेगडी नीट करवून घेतो (Cleaning Tips).

पण शेगडी व्यवस्थित चालत नसेल तर, एकदा बर्नर साफ करून पाहा. बर्नर साफ करण्याची प्रोसेस खूप मोठी आहे. पण जर आपल्याला घरगुती साहित्यात बर्नर साफ करायचं असेल तर, ही लिंबूची मदत घ्या. लिंबू आणि कोमट पाण्याच्या वापाराने बर्नर मिनिटात स्वच्छ होईल(How to clean gas burners and glass cooktops).

बर्नर स्वच्छ करण्यासाठी लागणारं साहित्य

कोमट पाणी

लिंबाचा रस

इनो

आंघोळीच्या बादल्या मेणचट-कळकट झाल्या? ३ जबरदस्त ट्रिक्स; बादल्या होतील स्वच्छ-दिसतील चकचकीत

मीठ

बेकिंग सोडा

डिश लिक्विड

या पद्धतीने करा बर्नर स्वच्छ

एका बाऊलमध्ये एक कप कोमट पाणी घ्या. त्यात एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा इनो, एक चमचा मीठ आणि एक चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स करा. या मिश्रणात बर्नर ४ तासांसाठी भिजत ठेवा.

मुंबईत घर, पगार हवा फक्त १ कोटी! नवरा कसा हवा, तरुणीच्या अपेक्षांची यादी व्हायरल

४ तासांसाठी भिजत ठेवल्यानंतर, बर्नर पाण्यातून बाहेर काढा. स्क्रबर घ्या, त्यावर डिश लिक्विड घेऊन बर्नर घासून काढा. शेवटी पाण्याने धुवा. काही मिनिटांसाठी पंखेच्या हवेखाली ठेवा. सुकल्यानंतर शेगडीवर लावा. अशा प्रकारे बर्नर काही मिनिटात स्वच्छ होईल. 

Web Title: How to clean gas burners and glass cooktops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.