गॅस पेटवण्यासाठी लायटरचा वापर होतो. लायटर नसेल तर गॅस कसा पेटवायचा हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. जेवण बनवून झाल्यानंतर आपण नियमितपणे गॅस साफ करतो. पण लायटर साफ करत नाही. बराच वेळ लायटर साफ न केल्यामुळे ते खूप कळकट - अस्वच्छ दिसतात. जेवण बनवत असताना मसाल्यांचे हात लागल्यामुळे ते चिकट होतात.
लायटर साफ करताना अनेकदा त्यात पाणी शिरते, ज्यामुळे लायटर खराब होण्याची शक्यता वाढते. त्याचा स्पार्क कमी होतो. त्यामुळे लायटर साफ कसा करावा असा प्रश्न गृहिणींना पडतो. लायटर खराब झाले की गॅस पेटवणे कठीण जाते. अशा स्थितीत आपण शेगडीवर अन्न देखील शिजवू शकत नाही. लायटर फार घाण झाले असेल तर, या टिप्सचा वापर करून पाहा. या टिप्समुळे काही मिनिटात घरच्या साहित्यात लायटर साफ होईल(Tips to clean Gas Lighter).
बेकिंग सोड्याचा करा असा वापर
लायटर साफ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबूचा वापर करा. यासाठी एका वाटीत लिंबाचा रस, १ चमचा बेकिंग सोडा घालून घट्ट पेस्ट बनवा. आता ही पेस्ट लाइटरवर लावा, ३० मिनिटांनंतर त्यावर लिंबाची साल चोळून पेस्ट काढून टाका. नंतर कोरड्या कापडाने लाइटर पुसून टाका.
भांडी घासण्याचा साबण संपला? ५ घरगुती सोपे उपाय, साबणाविना भांडी चकाचक
तांदळाच्या पाण्याने करा स्वच्छ
लायटर साफ करण्यासाठी, एका वाटीत इनो घ्या, त्यात १ चमचा तांदळाचं पाणी मिक्स करा. आता ही पेस्ट स्क्रबरच्या मदतीने लाइटरवर लावा. १५ मिनिटांनी लाइटर घासून स्वच्छ कापडाने पुसून टाका. यामुळे लाइटर त्वरित साफ होईल.
टूथपेस्टने स्वच्छ करा
लायटर साफ करण्यासाठी आपण टूथपेस्टची मदत घेऊ शकता. रात्री झोपण्यापूर्वी लायटरवर टूथपेस्ट लावा. सकाळी ब्रशने लायटर घासा. त्यानंतर कोरड्या कापडाने लायटर पुसून स्वच्छ करा. यामुळे लायटरचा चिकटपणा सहज दूर होईल.
केमिकल कशाला, घरच्या घरी बनवा ऑरगॅनिक धूप, घर राहील फ्रेश - कायम सुगंधित
रॉकेलची मदत घ्या
पाण्याने धुतल्यानंतर लायटर लवकर खराब होते. अशावेळी स्क्रबरवर रॉकेल टाकून लायटर स्वच्छ करा. तसेच, लायटरच्या आतील ग्रीस धारदार वस्तूने स्वच्छ करा. यामुळे लायटर झटपट चमकेल.
लायटरमध्ये पाणी शिरल्यावर करा हा उपाय
अनेकदा लायटरच्या आतमध्ये पाणी जाते, ज्यामुळे लायटरमधून स्पार्किंग होत नाही, व अनेक प्रयत्न करूनही गॅसची शेगडी पेटत नाही. अशावेळी गॅस लायटर कोरड्या कापडाने स्वच्छ करा, व काही वेळ उन्हात ठेवा. या ट्रिकमुळे लायटर व्यवस्थित काम करेल.