Lokmat Sakhi >Social Viral > वारंवार घासूनही बर्नर कळकटच? ३ सोपे उपाय- बर्नर होईल साफ - सिलेंडरचीही होईल बचत

वारंवार घासूनही बर्नर कळकटच? ३ सोपे उपाय- बर्नर होईल साफ - सिलेंडरचीही होईल बचत

How to Clean Gas Stove Burners; 3 Kitchen Hacks : गॅस बर्नर स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2024 10:00 AM2024-09-07T10:00:54+5:302024-09-07T10:05:06+5:30

How to Clean Gas Stove Burners; 3 Kitchen Hacks : गॅस बर्नर स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक

How to Clean Gas Stove Burners; 3 Kitchen Hacks | वारंवार घासूनही बर्नर कळकटच? ३ सोपे उपाय- बर्नर होईल साफ - सिलेंडरचीही होईल बचत

वारंवार घासूनही बर्नर कळकटच? ३ सोपे उपाय- बर्नर होईल साफ - सिलेंडरचीही होईल बचत

गॅसचा वापर प्रत्येक घरात होतो (Gas Burner). गॅस शेगडीवरच स्वयंपाक तयार होतो (Kitchen Hacks). स्वयंपाक तयार करण्यासाठी फक्त गॅस पुरेसं नसून, त्यासोबत शेगडी आणि सिलेंडरही गरजेच (Kitchen Tips). शिवाय बर्नरही स्वच्छ असायला हवे. बऱ्याचदा गृहिणी शेगडी व्यवस्थित काम करत नाही. किंवा गॅस लवकर संपण्याची तक्रार करतात. सिलेंडर तर भरलेले असते. पण तरीही बर्नर व्यवस्थित काम करत नाही.

अशावेळी मेकॅनिकला बोलवण्याऐवजी घरातच आपण बर्नर तपासू शकता, आणि बर्नर क्लीन करू शकता. बर्नर क्लीन करणं काहींना अवघड काम वाटतं. पण तसे नाही. आपण घरगुती साहित्यांचा वापर करूनही बर्नर क्लीन करू शकता. गॅस बर्नर साफ झाल्याने आपलं काम अधिकच सोपं होईल. शिवाय गॅसची फ्लेम चांगली चालेल(How to Clean Gas Stove Burners; 3 Kitchen Hacks).

साडी नेसल्यावर शोभून दिसणाऱ्या ८ सुंदर हेअरस्टाईल, सोप्या -झटपट पण देतात रॉयल लूक

बेकिंग सोडा आणि व्हीनेगर

स्वयंपाकात बेकिंग सोडा आणि व्हीनेगरचा वापर होतोच. आपण याच्या वापराने बर्नर देखील साफ करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये समप्रमाणात व्हीनेगर आणि बेकिंग सोडा घालून पेस्ट तयार करा. तयार पेस्टमध्ये बर्नर भिजत ठेवा. काही वेळानंतर टुथब्रशने बर्नर घासून स्वच्छ करा.

मनी प्लांटची पानं पिवळी पडली - मुळं कुजली? हळदीचा करून पाहा ‘असा’ उपयोग; वेल वाढेल सुंदर

लिंबाचा रस आणि मीठ

नैसर्गिक क्लीनर म्हणून लिंबाचा वापर होतो. आपण याच्या वापराने काळपट पडलेला बर्नरही साफ करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये लिंबाचा रस आणि मीठ घालून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट बर्नरला लावून काही वेळासाठी ठेवा. १० ते १५ मिनिटानंतर ब्रशने बर्नर घासून स्वच्छ करा. मिनिटात बर्नर क्लीन होईल, आणि गॅसही व्यवस्थित चालेल.

Web Title: How to Clean Gas Stove Burners; 3 Kitchen Hacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.