प्रत्येक घरात गॅस शेगडी (Gas Burner) असतेच. स्वयंपाक तयार करण्यासाठी गॅसची गरज भासतेच. ग्रामीण भागात अजूनही काही घरांमध्ये स्वयंपाक तयार करण्यासाठी चुलीचा वापर होतो. पण शहरी भागात गॅस शेगडी शिवाय जेवण तयार होऊ शकत नाही. गॅस शेगडीवरील प्रत्येक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. यासह गॅस बर्नर देखील तितकेच महत्वाचे आहे.
अनेक वेळा स्वयंपाक करताना बर्नरवर तेल किंवा इतर साहित्य सांडते. ज्यामुळे बर्नरची छिद्रे ब्लॉक होतात. या कारणाने गॅस ज्योत कमी जास्त होते, व गॅसचा जास्त वापर होतो. त्यामुळे वेळोवेळी गॅस बर्नर साफ करणे अत्यंत गरजेचं आहे (Cleaning Tips). जर आपल्याला गॅस बर्नर साफ कसे करायचे हे ठाऊक नसेल तर, एक रुपयांचा शाम्पू आणा, आणि त्याने बर्नर स्वच्छ करा(How to Clean Gas Stove Burners With Shampoo).
गॅस बर्नर स्वच्छ करण्यासाठी लागणारं साहित्य
मीठ
शाम्पू
घरात पालींचा सुळसुळाट? घाबरू नका, चुकचुकणाऱ्या पालींचा करा बंदोबस्त, ३ उपाय ताबडतोब
लिंबाचा रस
कोमट पाणी
या पद्धतीने करा गॅस बर्नरची स्वच्छता
सर्वप्रथम, बर्नर शेगडीवरून काढून एका प्लेटमध्ये ठेवा. त्यावर मीठ शिंपडा. नंतर त्यावर एक रुपयांचा शाम्पू, अर्धा चमचा लिंबाचा रस घाला, व एका साध्या टूथब्रशने बर्नर घासून काळपट डाग काढा.
खिडकीत-बाल्कनीत कबुतरांचा उच्छाद? ३ भन्नाट टिप्स; कबुतरं खिडकीजवळही फिरकणार नाहीत
नंतर सुईच्या मदतीने बर्नरमधील छिद्रे स्वच्छ करा. छिद्रे स्वच्छ केल्यानंतर एका बाऊलमध्ये कोमट पाणी घ्या. कोमट पाण्यात २ मिनिटांसाठी बर्नर भिजत ठेवा. २ मिनिटानंतर हाताने बर्नर स्वच्छ करा, व हवेखाली वाळत ठेवा. बर्नर सुकल्यानंतर गॅस शेगडीवर ठेवा. अशा प्रकारे बर्नर ५ मिनिटात चकाचक स्वच्छ होईल.