Lokmat Sakhi >Social Viral > ३ चमचा बेकिंग सोड्याने स्वच्छ करा कळकट शेगडी, मेहनत न घेता - काही मिनिटात स्वच्छ होईल शेगडी

३ चमचा बेकिंग सोड्याने स्वच्छ करा कळकट शेगडी, मेहनत न घेता - काही मिनिटात स्वच्छ होईल शेगडी

How to Clean Gas Stove Burners With Vinegar and Baking Soda गॅस शेगडी साफ करताना तासंतास जातो? ३ चमचे बेकिंग सोड्याने करा कळकट शेगडी स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2023 03:07 PM2023-07-23T15:07:22+5:302023-07-23T15:08:08+5:30

How to Clean Gas Stove Burners With Vinegar and Baking Soda गॅस शेगडी साफ करताना तासंतास जातो? ३ चमचे बेकिंग सोड्याने करा कळकट शेगडी स्वच्छ

How to Clean Gas Stove Burners With Vinegar and Baking Soda | ३ चमचा बेकिंग सोड्याने स्वच्छ करा कळकट शेगडी, मेहनत न घेता - काही मिनिटात स्वच्छ होईल शेगडी

३ चमचा बेकिंग सोड्याने स्वच्छ करा कळकट शेगडी, मेहनत न घेता - काही मिनिटात स्वच्छ होईल शेगडी

किचनची खरी मालकीण घरातील गृहिणी असते. ती रात्रंदिवस किचनमध्ये उभी राहून प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ तयार करते. यामुळे किचन अस्वच्छ होते. ओटा साफ करणे, भांडी आवरणे, सिंक स्वच्छ ठेवणे, यासह गॅस शेगडी साफ करणे ही मुख्य कामं तिला एकटीला करायला लागतात. जर आपण वर्किंग वूमन असाल तर, दररोज किचन साफ करायला वेळ मिळत नाही. मुख्य म्हणजे गॅस शेगडी लगेच खराब होते.

गॅस शेगडीवर आपण दररोज जेवण तयार करतो, ज्यामुळे त्याच्यावर चिकट डाग जमा होतात. हे डाग काढणे खूप कठीण जाते. जर आपल्याला हे डाग मेहनत न घेता काढायचे असतील तर, सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया यांनी शेअर केलेली टीप फॉलो करून पाहा. या ट्रिकमुळे काही मिनिटात, मेहनत न घेता गॅस शेगडी झटपट साफ होईल(How to Clean Gas Stove Burners With Vinegar and Baking Soda).

गॅस शेगडी स्वच्छ करण्यासाठी लागणारं साहित्य

बेकिंग सोडा

व्हिनेगर

कपड्यांवर पडलेले गंजाचे डाग निघता - निघत नाही? ४ भन्नाट टिप्स, डाग होतील गायब

गॅस शेगडी स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

गॅस शेगडी स्वच्छ करण्यासाठी एका वाटीत तीन ते चार चमचे बेकिंग सोडा घ्या, त्यात अर्धा कप व्हिनेगर मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. चमच्याच्या मदतीने ही पेस्ट गॅस स्टोव्ह आणि बर्नरभोवती ओता आणि चांगले पसरवा. ही पेस्ट गॅस शेगडीवर २० मिनिटासाठी ठेवा.

कोल्ड ड्रिंक उरले तर फेकू नका? कळकट टाइल्स ते गंजलेले नळ होतील स्वच्छ, ३ ट्रिक्स

२० मिनिटानंतर स्क्रबरच्या साहाय्याने गॅस स्टोव्ह हळूहळू घासून काढा. बेकिंग सोडा आणि व्हिनेगरमुळे गॅसवरील डाग मेहनत न घेता निघून जाईल. नंतर ओल्या कापडाने किंवा वंडर वाइप्सने गॅस स्टोव्ह कोरडा पुसून काढा. यामुळे काही मिनिटात गॅस शेगडी स्वच्छ होईल.

Web Title: How to Clean Gas Stove Burners With Vinegar and Baking Soda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.