Lokmat Sakhi >Social Viral > गॅस शेगडी वापरुन कळकट्ट झाली? सोपी ट्रिक, १० मिनीटांत शेगडी स्वच्छ- दिसेल एकदम चकाचक

गॅस शेगडी वापरुन कळकट्ट झाली? सोपी ट्रिक, १० मिनीटांत शेगडी स्वच्छ- दिसेल एकदम चकाचक

How To Clean Gas Stove Easily : पाहूया गॅसची शेगडी साफ करण्याची सोपी पद्धत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2023 12:11 PM2023-02-05T12:11:24+5:302023-02-05T12:15:14+5:30

How To Clean Gas Stove Easily : पाहूया गॅसची शेगडी साफ करण्याची सोपी पद्धत...

How To Clean Gas Stove Easily : Tired of using a gas grill? Simple trick, clean grate in 10 minutes - looks absolutely shiny | गॅस शेगडी वापरुन कळकट्ट झाली? सोपी ट्रिक, १० मिनीटांत शेगडी स्वच्छ- दिसेल एकदम चकाचक

गॅस शेगडी वापरुन कळकट्ट झाली? सोपी ट्रिक, १० मिनीटांत शेगडी स्वच्छ- दिसेल एकदम चकाचक

आपण सकाळी उठल्यापासून गॅसवर चहा, नाश्ता, स्वयंपाक असं सतत काही ना काही करत असतो. स्वयंपाक करताना काही गोष्टी गॅसवर सांडतात आणि गॅसची शेगडी खराब होते. यातही दूध, तेल असं काही सांडलं की ही शेगडी फारच चिकट आणि मेंचट होऊन जाते. नियमितपणे ही शेगडी साफ केली तर ठिक नाहीतर त्यावर थर जमा व्हायला लागतात. मग ओट्यावर मुंग्या, झुरळं जमायला लागतात. गॅसची शेगडी साफ करायची तर त्यासाठी काही सोपी ट्रिक आपल्याला माहित असायला हवी. फक्त साबण वापरण्यापेक्षा घरात सहज उपलब्ध असणाऱ्या काही इतर गोष्टींचा वापर केल्यास शेगडी साफ करण्याचे काम सोपे होते. पाहूया गॅसची शेगडी साफ करण्याची सोपी पद्धत (How To Clean Gas Stove Easily)...

गॅस झटपट साफ करायचा तर...

स्वयंपाक करुन झाल्यावर गॅसच्या शेगडीवर पाणी घाला आणि त्यावर सगळीकडे व्हिनेगर घालून ठेवा. १५ मिनीटे हे तसेच ठेवा, तोपर्यंत इतर कामं करा. घरात बेकींग सोडा असेल तर तोही यावर टाका. १५ मिनीटांनी स्क्रबरने घासून पाण्याने साफ करा. व्हिनेगर आणि सोड्यामुळे गॅस शेगडी एकदम चकाचक दिसेल.  

(Image : Google)
(Image : Google)

शेगडीवरचे काळे डाग काढण्यासाठी...    

बरेचदा आपण स्वयंपाक करतो पण घाईघाईत साफसफाई करण्याचे राहून जाते. एखादा सांडलेला पदार्थ बराच वेळ तसाच राहिला तर तो वाळून जातो आणि नंतर तो काढणे अवघड होऊन जाते. अशावेळी हे वाळलेले काळे डाग काढण्यासाठी एका बाऊलमध्ये कोमट पाणी घ्यावे. त्यामध्ये लिंबाचा रस घालावा, त्यात बेकींग सोडा आणि व्हिनेगर घालावे. हे मिश्रण गॅस शेगडीवर घालून शेगडी खराब झालेल्या टुथब्रशने साफ करावी. यामुळे शेगडी साफ होण्यास तर मदत होईलच, पण शेगडीवरचा राप निघून जाण्यास याची चांगली मदत होईल.

(Image : Google)
(Image : Google)

गॅस बर्नर किंवा नॉब साफ करण्यासाठी..

बराच काळ बर्नर किंवा नॉब साफ केले नसतील तर त्यामध्ये घाण अडकायला सुरुवात होते. अशावेळी यामध्ये अडकलेली घाण बारकाईने स्वच्छ कशी करायची हे आपल्याला माहित असायला हवे. यासाठी सगळ्यात आधी गॅस बंद करुन नॉब काढून घ्या. त्यानंतर डिटर्जंट पावडर लावून नळाच्या खाली हे नॉब धुवा. त्यानंतर एका बाऊलमध्ये व्हिनेगर घेऊन हे नॉब स्क्रबर किंवा जुन्या टुथब्रशने घासा. आता वाहत्या पाण्याखाली हे नॉब स्वच्छ धुवा आणि पूर्ण कोरडे झाल्यानंतर गॅसच्या शेगडीला लावून टाका. 
 

Web Title: How To Clean Gas Stove Easily : Tired of using a gas grill? Simple trick, clean grate in 10 minutes - looks absolutely shiny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.