Join us

पदार्थ-तेलाचे चिकट डाग निघतील मिनिटांत, ५ सोप्या ट्रिक्स, गॅस शेगडी होईल एकदम चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2025 17:04 IST

Quick gas stove cleaning tips: How to clean gas stove in 5 minutes: Remove burn marks from gas stove: Effective gas stove cleaning hacks: Fast kitchen cleaning tips: Burnt kitchen appliance cleaning: Easy gas stove cleaning solution: Cleaning inside of a gas stove: Natural gas stove cleaner: आपल्याही गॅस स्टोव्हवर घाणीचे आणि तेलाचे चिकट डाग काढायचे असतील तर या सोप्या ट्रिक्स फॉलो करा.

आपल्यापैकी अनेकांच्या स्वयंपाकघरात गॅस स्टोव्ह पाहायला मिळतो.(Quick gas stove cleaning tips) हल्ली त्यामध्ये देखील अनेक प्रकार पाहायला मिळतात. काचेचा, स्टीलचा गॅस अर्थात काही वर्षांनी काळपट पडतो.(How to clean gas stove in 5 minutes) जेवण बनवताना त्यावर डाळीचे, तेलाचे किंवा दुधाचे डाग सहज पडतात. याकडे दुर्लक्ष केल्याने शेगडीच्या वरचा भाग हा अधिक घाण, काळा आणि चिकट होतो. त्यामुळे आपल्याला बदलण्याची इच्छा होते. (Remove burn marks from gas stove)

काचेचा गॅस स्टोव्ह हा टिन स्टोव्ह किंवा स्टिलच्या स्टोव्हपेक्षा अधिक महाग असतो.(Effective gas stove cleaning hacks) त्यामुळे तो बदलताना अधिक पैसेही जातात. वेळोवेळी शेगडी साफ करुन देखील त्यावर घाणीचे डाग तसेच राहातात.(Fast kitchen cleaning tips) जेवण बनवताना देखील आपल्याला किळस येते. नियमितपणे साफसफाई केल्याने स्टोव्हचे आयुष्य देखील वाढते आणि स्वयंपाकघर देखील स्वच्छ राहाते. जर आपल्याही गॅस स्टोव्हवर घाणीचे आणि तेलाचे चिकट डाग काढायचे असतील तर या सोप्या ट्रिक्स फॉलो करा. (Easy gas stove cleaning solution)

उन्हाळ्यात एसीचे बिल पाहून घाम फुटतो? ७ सोप्या टिप्स, बिल येईल कमी- मिळेल गारेगार हवेचं सुख

1. व्हिनेगर आणि बेकिंग सोडा 

गॅस स्टोव्ह स्वच्छ करण्यासाठी गॅस बर्नर आणि स्टोव्ह वेगळे करा. एका भांड्यात बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिसळा. त्याचा फेस तयार झाला की, ही पेस्ट चुलीवर लावा. १५ मिनिटानंतर स्क्रबर किंवा ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा. यामुळे गॅस नव्यासारखा चमकेल. 

2. लिंबू आणि मीठ 

गॅसवर तेलाचे आणि डाळीचे चिकट थर साचले असतील तर लिंबू आणि मीठाचा वापर करु शकता. यासाठी लिंबाच्या रसात थोडे मीठ मिसळा. हे मिश्रण गॅस स्टोव्ह घासून घ्या. काही वेळ तसेच राहू द्या. वीस मिनिटानंतर ओल्या कापडाने स्वच्छ करा. यामुळे गॅस स्टोव्ह चमकण्यास मदत होईल. 

कारली खाताना मुले नाक मुरडतात? ६ सोपे उपाय, कडू कारली घरातले आवडीने खातील

3. डिटर्जंट आणि कोमट पाणी 

डिशवॉश डिटर्जंटमध्ये थोडे गरम पाणी मिसळा. हे मिश्रण बर्नर आणि स्टोव्हवर ओता आणि स्क्रबरने स्वच्छ करा. गरम पाण्यामुळे स्टोव्हचा काळेपणा आणि ग्रीस कमी करण्यास मदत होईल. 

4. व्हिनेगर आणि पाणी 

व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळा. हे द्रावण एका स्प्रे बाटलीत भरा आणि गॅसवर स्प्रे करा. काही वेळा स्वच्छ कापडाने स्टोव्ह स्वच्छ करा. व्हिनेगर गॅसवरील घाण साफ करण्यास मदत करेल. तसेच तो नव्याने चमकेलही. 

5. बेसन आणि लिंबाचे मिश्रण 

बेसन आणि लिंबाचा रसाचे मिश्रण तयार करा. ते गॅसवर घासून घ्या. यामुळे गॅस स्टोव्हवर जमा झालेले ग्रीस आणि काळेपणा दूर होण्यास मदत होईल. गॅस साफ करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्स