Lokmat Sakhi >Social Viral > गॅस शेगडी खराब झाल्याने सतत मुंग्या, झुरळं होतात? १० मिनीटांत अशी करा शेगडी साफ...

गॅस शेगडी खराब झाल्याने सतत मुंग्या, झुरळं होतात? १० मिनीटांत अशी करा शेगडी साफ...

How to Clean Gas Stove Tips by MasterChef Pankaj Bhadouria : वेळच्या वेळी ती साफ केली नाही तर हा राप साठत जातो आणि नंतर ती शेगडी इतकी खराब होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2022 02:58 PM2022-09-18T14:58:29+5:302022-09-18T15:00:28+5:30

How to Clean Gas Stove Tips by MasterChef Pankaj Bhadouria : वेळच्या वेळी ती साफ केली नाही तर हा राप साठत जातो आणि नंतर ती शेगडी इतकी खराब होते

How to Clean Gas Stove Tips by MasterChef Pankaj Bhadouria : Constant ants, cockroaches due to broken gas grill? Do this in 10 minutes to clean the grate... | गॅस शेगडी खराब झाल्याने सतत मुंग्या, झुरळं होतात? १० मिनीटांत अशी करा शेगडी साफ...

गॅस शेगडी खराब झाल्याने सतत मुंग्या, झुरळं होतात? १० मिनीटांत अशी करा शेगडी साफ...

Highlights४ स्टेप्समध्ये गॅस शेगडी चकचकीत करायची असेल तर काय करायचे याविषयी त्या आपल्या सोशल मीडियावरुन माहिती देतात. ४ स्टेप्समध्ये गॅस शेगडी चकचकीत करायची असेल तर काय करायचे याविषयी त्या आपल्या सोशल मीडियावरुन माहिती देतात. आपल्या फॉलोअर्सना स्वयंपाकच नाही तर त्याच्याशी निगडीत इतरही अनेक गोष्टींबाबत माहिती देत असतात.

सकाळी उठल्यापासून आपण गॅसवर चहा करणे, दूध तापवणे, स्वयंपाक करणे अशा असंख्य गोष्टी करत असतो. घरात जास्त लोकं असतील तर गॅसचा वापरही नकळत जास्त केला जातो. कधीतरी नकळतपणे आपल्याकडून स्वयंपाक करताना शेगडीवर काहीतरी सांडते नाहीतर दूध, चहा किंवा आणखी काही गोष्टी उतू जातात. यामुळे गॅस शेगडी खराब होते. वेळच्या वेळी ती साफ केली नाही तर हा राप साठत जातो आणि नंतर ती शेगडी इतकी खराब होते की कितीही घासली तरी काही केल्या स्वच्छ होत नाही. शेगडीवर अन्नाचे किंवा इतर कसले कण तसेच राहीले की त्याठिकाणी झुरळं आणि मुंग्या लागतात. स्वच्छतेच्या दृष्टीने आणि आरोग्यासाठी हे अजिबात चांगले नसल्याने आपल्याला शेगडी कधीतरी साफ करणे भाग असते. आता ही शेगडी साफ करायची म्हणजे ती घासून आपले हात दुखायला लागतात (How to Clean Gas Stove Tips by MasterChef Pankaj Bhadouria).

(Image : Google)
(Image : Google)

पण अगदी सोप्या पद्धतीने झटपट शेगडी साफ करायची तर काही सोप्या ट्रीक्स आपल्याला माहित असायला हव्यात. रोजच्या धावपळीत आपण गॅस आणि ओटा नुसता पुसून घेत असलो तरी वीकेंडला मात्र आपण तो आवर्जून साफ करतो. अशावेळी कमीत कमी साधनांमध्ये पटकन गॅस साफ करण्यासाठी प्रसिद्ध शेफ पंकज भदौरीया काही महत्त्वाच्या टिप्स सांगतात. ४ स्टेप्समध्ये गॅस शेगडी चकचकीत करायची असेल तर काय करायचे याविषयी त्या आपल्या सोशल मीडियावरुन माहिती देतात. इन्स्टाग्रामवर त्यांनी नुकताच याविषयीची व्हिडिओ अपलोड केला असून अतिशय सोप्या पद्धतीने गॅस सफाईच्या टिप्स त्यांनी यामध्ये सांगितल्या आहेत. ‘पंकज के नुस्खे’ या सिरीजमध्ये त्या आपल्या फॉलोअर्सना स्वयंपाकच नाही तर त्याच्याशी निगडीत इतरही अनेक गोष्टींबाबत माहिती देत असतात. पाहूयात यामध्ये त्या नेमकं काय सांगतात.

१. एका बाऊलमध्ये बेकींग सोडा घ्या, त्यामध्ये व्हिनेगर मिक्स करुन त्याची घट्टसर पेस्ट तयार करा. 
२. बर्नर बाजूला काढून गॅस शेगडीवर ही पेस्ट सगळीकडे घालून घ्या.
३. त्यानंतर स्क्रबरच्या साह्याने हलक्या हाताने शेगडीला ज्याठिकाणी डाग आहेत तिथे घासून घ्या.
४. पुढचे २० मिनीटे हे मिश्रण शेगडीवर असेच ठेवा. 
५. हे मिश्रण काहीसे वाळलेले असल्याने ओला कपडा किंवा ऑलिव्ह ऑईलच्या मदतीने शेगडीवर टाकलेले हे मिश्रण पुसून घ्या. 
६. यामुळे तुमचा गॅस नवीन असल्यासारखा चमकायला लागेल. 

Web Title: How to Clean Gas Stove Tips by MasterChef Pankaj Bhadouria : Constant ants, cockroaches due to broken gas grill? Do this in 10 minutes to clean the grate...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.