किचनची साफसफाई करणं किती गरजेचं आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. मुख्य म्हणजे किचनसोबत गॅस स्टोव्हची स्वच्छता राखणं देखील तितकेच महत्वाचे आहे. किचनमध्ये दररोज वापरण्यात येणारी वस्तू म्हणजे शेगडी. पण स्वयंपाक करताना गॅस बर्नर सर्वात घाण होते. धुळीचे कण बर्नरच्या छिद्रांमध्ये अडकतात, ज्यामुळे बर्नरची फ्लेम कमी होत जाते. शिवाय गॅसही वाया जातो, आणि जेवण लवकर शिजतही नाही. त्यामुळे वेळेवर बर्नर साफ करणे गरजेचं आहे.
अनेकांना बर्नर साफ करावे कसे? हे ठाऊक नसते. जर आपल्याला घरच्या घरी सोप्या पद्धतीने बर्नर साफ करायचे असेल तर, मिठाचा वापर करा. मीठ फक्त पदार्थाची चव वाढवण्यासाठी नसून, बर्नर साफ करण्यासाठीही उपयुक्त ठरते. ते कसे पाहूयात(How To Clean Gas Stove Top by use of Salt).
मिठाच्या वापराने करा बर्नरची स्वच्छता
बऱ्याचदा स्वयंपाक करताना बर्नरमध्ये पदार्थाचे कण अडकतात, ज्यामुळे बर्नरची फ्लेम कमी होते. शिवाय गॅसही वाया जातो. याची स्वच्छता करण्यासाठी आपण मिठाचा वापर करू शकता.
नितीन गडकरींनी सांगितली दही वांग्याच्या कापांची हटके-सिंपल रेसिपी, चवीला जबरदस्त
लागणारं साहित्य
डिश लिक्विड
लिंबू
बेकिंग सोडा
मीठ
या पद्धतीने तयार करा बर्नर क्लीनर
गॅस बर्नर क्लिनिंगसाठी पेस्ट तयार करा. यासाठी एका बाऊलमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात लिंबाचा रस घाला. नंतर त्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा, एक चमचा डिश लिक्विड, आणि अर्धा चमचा मीठ घालून मिक्स करा, व गॅस बंद करा. अशा प्रकारे बर्नर क्लीनर तयार.
ज्वारीच्या पिठाची लुसलुशीत मसाला इडली; बनवायला सोपी; पौष्टिक - वजन होईल कमी
या पद्धतीने साफ करा बर्नर
सर्वप्रथम, गॅस बर्नर बाजूला काढून ठेवा. नंतर तयार मिश्रणात बर्नर ५ मिनिटांसाठी ठेवा, व गॅस चालू करा. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा. थंड झाल्यावर लिंबाच्या सालीने बर्नर नीट घासून घाण काढून टाका. लिंबू चोळल्यानंतर बर्नर स्वच्छ पाण्याने धुवा आणि काही काळ कोरडे करण्यासाठी बाजूला ठेवा. अशा प्रकारे बर्नर काही मिनिटात स्वच्छ होईल.