Lokmat Sakhi >Social Viral > टॉयलेट- बाथरुमच्या खिडक्यांच्या काचा स्वच्छ करणं अवघड जातं? बघा सोपी ट्रिक- ५ मिनिटांत काचा चकाचक

टॉयलेट- बाथरुमच्या खिडक्यांच्या काचा स्वच्छ करणं अवघड जातं? बघा सोपी ट्रिक- ५ मिनिटांत काचा चकाचक

Home Hacks: टॉयलेट- बाथरुमच्या छोट्या काचेच्या खिडक्या स्वच्छ करणं कठीण जात असेल तर ही एक मस्त ट्रिक पाहा... (how to clean glass panel in toilet and bathroom?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2024 09:06 AM2024-06-29T09:06:43+5:302024-06-29T09:10:01+5:30

Home Hacks: टॉयलेट- बाथरुमच्या छोट्या काचेच्या खिडक्या स्वच्छ करणं कठीण जात असेल तर ही एक मस्त ट्रिक पाहा... (how to clean glass panel in toilet and bathroom?)

how to clean glass panel in toilet and bathroom, simple trick to clean small glass window in toilet and bathroom | टॉयलेट- बाथरुमच्या खिडक्यांच्या काचा स्वच्छ करणं अवघड जातं? बघा सोपी ट्रिक- ५ मिनिटांत काचा चकाचक

टॉयलेट- बाथरुमच्या खिडक्यांच्या काचा स्वच्छ करणं अवघड जातं? बघा सोपी ट्रिक- ५ मिनिटांत काचा चकाचक

Highlightsहा उपाय करण्यासाठी तुम्हाला स्वयंपाक घरातला पापड भाजण्याचा चिमटा आणि दोन जुने सॉक्स लागणार आहेत. 

बहुसंख्य घरांच्या टॉयलेट- बाथरुममध्ये एक काचेचं पॅनल असतं. त्या छोट्या खिडकीला ४ ते ५ आडव्या काचा लावलेल्या असतात. या काचा तिरक्या रेषेत उघडतात. त्यामुळे त्यांची स्वच्छता करणं थोडं कठीण जातं. कारण दोन काचांमधली जागा एवढी छोटी असते की आपण त्यामध्ये हात घालून किंवा बोट घालून त्या स्वच्छ करू शकत नाही. त्यामुळे आतल्या बाजुने आपण त्या धुवून घेतल्या तरी बाहेरच्या बाजुने त्या अस्वच्छच राहतात (how to clean glass panel in toilet and bathroom?). त्यांच्यावरची धूळ तशीच राहाते. म्हणूनच आता हे अवघड काम अतिशय सोपं करण्याची ही खास ट्रिक एकदा पाहून घ्या.. (simple trick to clean small glass window in toilet and bathroom)

टॉयलेट बाथरुमचे ग्लास पॅनल स्वच्छ करण्याची ट्रिक

टॉयलेट बाथरुमचे ग्लास पॅनल कसे स्वच्छ करायचे याचा एक खास उपाय simply.marathi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

ताप आल्याने तोंड कडू पडलं- काही खाण्याची इच्छाच नाही? तोंडाला चव येण्यासाठी ३ पदार्थ खा

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला स्वयंपाक घरातला पापड भाजण्याचा चिमटा आणि दोन जुने सॉक्स लागणार आहेत. 

चिमट्याच्या दोन्ही बाजुंमध्ये सॉक्स घाला आणि रबर लावून तो पॅक करा. आता त्या सॉक्सवर लिक्विड डिटर्जंट आणि पाणी टाकून ते ओले करून घ्या आणि प्रत्येक काच त्या चिमट्यात पकडून स्वच्छ करा. तुमचं काम खूप सोपं होईल.

 

हे देखील लक्षात घ्या...

पाईप लावून थेट त्या काचांवर पाणी सोडूनही तुम्ही ग्लास पॅनल स्वच्छ करू शकता.

वजन कमी करण्यासाठी एकवेळचं जेवण, नाश्ता बंद केला? वाचा तज्ज्ञांचा सल्ला- असं कराल तर...

पण तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहात असाल तर ते पाणी बाहेरच्या बाजुने ओघळून खालच्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांच्या टॉयलेट- बाथरुमच्या खिडकीत तर जाणार नाही ना, याची काळजी मात्र घ्यावी लागेल. 

 

Web Title: how to clean glass panel in toilet and bathroom, simple trick to clean small glass window in toilet and bathroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.