Join us  

काचेच्या बाटल्या स्वच्छ करण्याची १ भन्नाट सोपी ट्रिक, काचेच्या बाटल्या दिसतील नव्यासारख्या लख्ख...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2024 11:53 AM

How to Clean the Inside of a Narrow Neck Glass Bottle At Home : रोजच्या वापरातील काही काचेच्या ऍबटळूणची तोंड निमुळती असतात अशा बाटल्या स्वच्छ करण्याचा झटपट उपाय...

किचनची व किचनमधल्या छोट्या - मोठ्या गोष्टींची आपण कायम स्वच्छता ठेवत असतो. किचनमधली एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाण्याच्या बाटल्या. या पाण्याच्या बाटल्या प्रत्येकाच्या घरात असतातच. या पाण्याच्या बाटल्या आपण रोज वापरत असतो त्यामुळे त्या रोज स्वच्छ देखील केल्या पाहिजेत. पाण्याच्या बाटल्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काही बाटल्या प्लॅस्टीक, स्टिल, कॉपर किंवा काचेच्या असतात. प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक असल्यामुळेआजकाल सगळेच स्टील, कॉपर किंवा काचेच्या बाटल्या वापरणे पसंत करतात(Easy Tips & Hacks : How To Clean Glass Bottles).

या वेगवेगळ्या प्रकारच्या बाटल्यांची स्वच्छता करण्याची पद्धत देखील वेगळी असते. त्यातही काचेच्या भांड्यांची स्वच्छता अतिशय काळजीपूर्वक करावी लागते. काचेच्या आणि प्लॅस्टिकच्या बाटल्या वेळच्यावेळी स्वच्छ केल्या नाही तर यामध्ये वास येऊ लागतो. त्याचबरोबर काहीवेळा या काचेच्या बाटल्यांची तोंड ही फारच निमुळती असतात. त्यामुळे अशा बाटल्या आतून साफ करणे (How do I clean glass bottles for reuse) फारसे शक्य होत नाही. अशावेळी नेमके काय करावे असा प्रश्न पडतो. त्यामुळे काचेच्या बाटल्या स्वच्छ करण्याची एक सोपी ट्रिक पाहूयात(How to Clean the Inside of a Narrow Neck Glass Bottle At Home).

काचेच्या बाटल्या कशा स्वच्छ कराव्यात ? 

१. काचेच्या बाटल्या आतून स्वच्छ करण्यासाठी सर्वात आधी त्यात १ टेबलस्पून तांदूळ, प्रत्येकी अर्धी वाटी पाणी व व्हिनेगर घालावे. हे सगळे जिन्नस काचेच्या बाटलीत घालून बाटली व्यवस्थित हलवून घ्यावी. बाटलीतील मिश्रण संपूर्ण बाटलीच्या कानाकोपऱ्यात जाईल याची खबरदारी घ्यावी. बाटली चांगली खळखळवून हलवून घ्यावी. 

धुतलेली भांडी ठेवण्याची स्टीलची जाळी अस्वच्छ दिसते? १ भन्नाट ट्रिक, जाळी दिसेल नव्यासारखी चकचकीत...

फोमच्या खुर्च्यांवरची धूळ काढून त्या स्वच्छ करण्याची नवीकोरी ट्रिक, खुर्च्या दिसतील पुन्हा नव्यासारख्या... 

२. आता या बाटलीतील तांदुळाचे मिश्रण काढून टाकावे. त्यानंतर काचेच्या बाटलीत १ टेबलस्पून डिश वॉश लिक्विड सोप व गरम पाणी घालून बाटली खळखळून हलवून घ्यावी. त्यानंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा ही काचेची बाटली धुवून घ्यावी.

अशाप्रकारे आपण काचेच्या बाटल्या अगदी सहजपणे घरच्या घरी धुवून स्वच्छ करु शकतो.

आजकाल रोजच्या वापरातले तेल स्टोअर करून ठेवण्यासाठी देखील कचयच्या बाटल्यांचा वापर केला जातो. अशा या तेलाच्या बाटल्या आतून कशा स्वच्छ कराव्यात असा प्रश्न आपल्याला पडतो. वरील पद्धतीचा वापर करून आपण या तेलाच्या तेलकट बाटल्या देखील अगदी सहजपणे स्वच्छ करु शकतो. 

जीन्सवर पडलेत चिखलाचे डाग ? ४ सोपे उपाय, आता पावसाळ्यातही जीन्स घाला बिनधास्त !

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सकिचन टिप्स