Join us  

सराफाकडे न जाता सोन्याचे दागिने चमकतील; फक्त बेकिंग सोड्याचा 'असा' वापर करा; मिनिटात दागिने स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2024 4:14 PM

How to Clean Gold Jewelry in 10 minutes by using baking soda : चमचाभर बेकिंग सोड्याने लख्ख उजळतील सोन्याचे दागिने; फक्त 'हा' उपाय करून पाहा

सणावार (Festival) जवळ आल्यावर आपण हमखास सोन्याचे दागिने घालतो (Baking soda). आता दसरा येईल. दसऱ्याला आपण सोन्याचा नेकलेस, कानातले किंवा अंगठी घालतो (Cleaning Tips). सोन्याचे दागिने (Gold Ornaments) वेळीच स्वच्छ करणंही गरजेचं आहे. कारण तिजोरीत ठेवल्यानंतर सोन्याचे दागिने काळपट पडतात. काही जण सोन्याचे दागिने जसे की कानातले, गळ्यातले, नियमित वापरतात. महिनाभरानंतर काळपट पडतात. शिवाय दागिन्याची चमकही हरवते.

आता काही दिवसांमध्ये दसरा येईल. दसऱ्यामध्ये आपण सोन्याचे दागिने घालतो. पण दागिने घालण्यापूर्वी पॉलिश करण्यासाठी सराफाकडे देतो. सराफ दागिने पॉलिश करण्याचे खूप पैसेही घेतो. जर आपल्याला सराफाकडे न जाता, घरगुती ट्रिकने दागिने स्वच्छ करायचे असतील तर, या खास ट्रिकचा वापर करून पाहा. अगदी मिनिटात सोन्याचे दागिने स्वच्छ होतील(How to Clean Gold Jewelry in 10 minutes by using baking soda).

सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी टिप्स

लिक्विड डिश डिटर्जंट

एका भांड्यात गरम पाणी घ्या. त्यात लिक्विड डिश डिटर्जंट घालून मिक्स करा. यासह आपण त्यात सोडियम फ्री सेल्टझरही घालू शकता. यामध्ये असलेले कार्बोनेशन दागिन्यांवर चिकटलेली घाण आणि काळपटपणा काढून टाकण्यास मदत करते. काही वेळानंतर ब्रशने सोन्याचे दागिने स्वच्छ करा. आणि वाहत्या पाण्याखाली धुवून घ्या.

भाजीसोबत फुकट मिळणारी 'ही' पानं वेट लॉससाठी बेस्ट; चमचाभर चटणी रोज खा; पोटाची चरबी झरकन घटेल

टूथपेस्ट

आपण टूथपेस्टच्या वापरानेही दागिने स्वच्छ करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये पाणी घ्या. त्यात टूथपेस्ट घालून मिक्स करा. ब्रश पेस्टमध्ये बुडवा, आणि दागिने घासून काढा. टूथपेस्टमुळे दागिन्यांमध्ये अडकलेली घाण सहज निघेल.

चपाती खाऊन वजन वाढतं? 'या' पिठाच्या चपात्या खा; वेट लॉस होईल - भुकेवरही राहील कंट्रोल

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

एका भांड्यात बेकिंग सोडा घ्या, त्यात पाणी घालून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट दागिन्यांवर लावून ब्रशने घासा. नंतर व्हिनेगरने दागिने स्वच्छ घ्या. शेवटी कोमट पाण्याने सोन्याचे दागिने क्लिन करा. अगदी काही मिनिटात सराफाकडे न जाता, सोन्याचे दागिने चमकतील.

टॅग्स :स्वच्छता टिप्सदसरासोशल व्हायरल