Join us  

सोन्याचांदीचे दागिने लख्ख चमकतील, स्वयंपाक घरातली फक्त १ गोष्ट वापरा, दागिने होतील चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2023 12:09 PM

Use of Lemon for Cleaning Jewellery: सोन्याचांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी खराब झालेल्या लिंबांचा खूप चांगला उपयोग करता येताे. तो नेमका कसा करायचा, ते पाहूया (gold, silver ornaments)...

ठळक मुद्देदागिने असे छान चमकतील की नंतर सोन्याचांदीचे  दागिने सराफ्यामध्ये जाऊन पॉलीश करण्याची गरजच पडणार नाही.

श्रावण आला आणि मंगळागौरींना सुरुवात झाली. आता काहीच दिवसांत राखी पौर्णिमेचा सणही येत आहे. श्रावण सरला की मग दिवाळीपर्यंत एका मागे एक सण सुरूच असतात. सणासुदीला आवर्जून दागदागिने घातले जातात. म्हणूनच सणासुदीच्या आधी  दागिने चमकवायचे असतील, तर हा एक सोपा घरगुती उपाय करून बघा. दागिने असे छान चमकतील की नंतर सोन्याचांदीचे  दागिने सराफ्यामध्ये जाऊन पॉलीश करण्याची गरजच पडणार नाही. शिवाय एकही पैसा त्यासाठी खर्च करण्याची गरज नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सुकलेले किंवा खराब झालेली लिंबं वापरायची आहेत.

 

सोन्याचांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी उपायसाहित्य४ ते ५ लिंबू

२ टेबलस्पून मीठ

मंगळागौरीसाठी परफेक्ट पारंपरिक लूक हवा? ७ स्पेशल टिप्स, चारचौघीत उठून दिसाल

२ ग्लास पाणी 

१ टेबलस्पून चहा पावडर

१ टेबलस्पून बेकिंग साेडा

 

सोन्याचांदीचे दागिने कसे स्वच्छ करायचे?१. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी पाणी गॅसवर तापायला ठेवा आणि त्यात मीठ टाका.

२. पाणी गरम झाल्यावर त्यात लिंबाच्या फोडी आणि चहा पावडर टाका.

३. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा आणि त्यात बेकिंग सोडा टाका.

रक्षाबंधन स्पेशल: १०० रुपयांपेक्षा कमी किमतीतही मिळेल आकर्षक गिफ्ट, बघा ३ खास पर्याय

४. हे पाणी आपल्याला सोन्याचांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी वापरायचे आहे.

५. जर तुम्ही सोन्याचे दागिने स्वच्छ करणार असाल तर पाण्यात १ टीस्पून हळद टाका.  चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी हळद टाकण्याची गरज नाही.

६. या गरम पाण्यात ८ ते १० मिनिटे दागिने भिजत ठेवा. त्यानंतर बाहेर काढून खराब झालेल्या टुथब्रशने थोडेसे घासा आणि नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सदागिनेसोनंचांदी