Lokmat Sakhi >Social Viral > काळे पडलेले सोन्याचे दागिने १० मिनिटांत करा चकाचक, पॉलिशिंगसाठी उगाच पैसे कशाला घालवायचे... 

काळे पडलेले सोन्याचे दागिने १० मिनिटांत करा चकाचक, पॉलिशिंगसाठी उगाच पैसे कशाला घालवायचे... 

How To Clean Golden Jewellery At Home: काळ्या पडलेल्या सोन्याच्या दागिन्यांना घरच्याघरी नव्यासारखी चमक कशी द्यायची याविषयीचा हा एक सोपा उपाय पाहा.. (simple tricks and tips to clean blakish golden jewellery)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2024 04:14 PM2024-09-20T16:14:49+5:302024-09-20T16:15:31+5:30

How To Clean Golden Jewellery At Home: काळ्या पडलेल्या सोन्याच्या दागिन्यांना घरच्याघरी नव्यासारखी चमक कशी द्यायची याविषयीचा हा एक सोपा उपाय पाहा.. (simple tricks and tips to clean blakish golden jewellery)

how to clean golden jewellery at home, simple tricks and tips to clean blakish golden jewellery | काळे पडलेले सोन्याचे दागिने १० मिनिटांत करा चकाचक, पॉलिशिंगसाठी उगाच पैसे कशाला घालवायचे... 

काळे पडलेले सोन्याचे दागिने १० मिनिटांत करा चकाचक, पॉलिशिंगसाठी उगाच पैसे कशाला घालवायचे... 

Highlightsसोन्याचे दागिने कधीही जोरात घासू नयेत कारण ते नाजूक असतात. जोरात घासल्याने त्यांच्यावरचं मीनाकाम, इतर नक्षी खराब होण्याची भीती असते.

सोन्याचे दागिने वापरून वापरून बऱ्याचदा काळे पडतात. काळे पडलेले किंवा चकाकी नसलेले सोन्याचे दागिने अंगावर अजिबातच उठून दिसत नाहीत. शिवाय त्यांच्यामध्ये मळ अडकून पडल्याने कधी कधी ते जास्तच काळे पडतात तर कधी पांढरट रंगाचे दिसू लागतात (how to clean golden jewellery at home?). तुमच्याकडच्या सोन्याच्या दागिन्यांची अशीच गत झाली असेल तर त्यांना नवी झळाळी देण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरातले फक्त २ पदार्थच लागणार असून कमीतकमी वेळेत आणि अजिबात मेहनत न घेता दागिने स्वच्छ होतील.(simple tricks and tips to clean blakish golden jewellery)

 

सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याचा उपाय

सोन्याचे दागिने अगदी झटपट कसे स्वच्छ करायचे याविषयीचा हा एक सोपा उपाय Puneri tadka या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

डाळ- तांदळाचा मऊसूत जाळीदार ढोकळा करण्याची सोपी रेसिपी! नाश्ता होईल खमंग- चवदार

हा उपाय करण्यासाठी आपल्याला हळद आणि डिटर्जंट पावडर हे दोन पदार्थ लागणार आहेत. सोन्याचे दागिने पॉलिश करण्यासाठी जर आपण सोनाराकडे नेले तर त्यासाठी कमीतकमी १ हजार रुपये तरी मोजावे लागतात. एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा मोजके ५- १० रुपये खर्च असणारा हा उपाय नक्कीच परवडणारा आहे.

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये अर्धा चमचा हळद घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा डिटर्जंट पावडर टाका. आता त्यामध्ये थोडं कोमट पाणी टाका. 

 

सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या आणि त्यामध्ये तुमचे सोन्याचे दागिने १० मिनिटांसाठी भिजत ठेवा.

साध्याच साडीला द्या मॉडर्न लूक! स्टायलिश पद्धतीने साडी नेसण्यासाठी ५ टिप्स- दिसाल आकर्षक

१० मिनिटांनंतर दागिने हळदीच्या पाण्यातून बाहेर काढा. तुम्हाला लगेचच त्यांच्यावरचा काळेपणा बऱ्यापैकी कमी झालेला जाणवेल. तरीसुद्धा दागिने काळेच दिसत असतील तर एखादा जुना टुथब्रश घ्या आणि दागिने अलगद घासून काढा. त्यानंतर पुन्हा ते स्वच्छ पाण्यात टाकून धुवून- पुसून घ्या. दागिने अगदी स्वच्छ झाल्यासारखे दिसतील. 

सोन्याचे दागिने कधीही जोरात घासू नयेत कारण ते नाजूक असतात. जोरात घासल्याने त्यांच्यावरचं मीनाकाम, इतर नक्षी खराब होण्याची भीती असते. 

 

Web Title: how to clean golden jewellery at home, simple tricks and tips to clean blakish golden jewellery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.