Join us  

हेअर ब्रशमध्ये अडकलेल्या केसांचा गुंता काढण्याची भन्नाट ट्रिक, ब्रश होईल क्लिन, केस विंचरताना गुंता होणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2024 3:35 PM

How to clean hairbrush : How To Clean Hairbrushes Quick & Easy : हेअर ब्रश वारंवार स्वच्छ करण्याऐवजी एका सोप्या ट्रिकचा करा वापर, हेअर ब्रश होईल स्वच्छ...

केस विंचरण्यासाठी आपण कंगव्याचा वापर करतो. कंगव्याने रोज केस विंचरल्याने केस आणि स्कॅल्पची त्वचा हेल्दी राहण्यास मदत मिळते. पूर्वी केस विंचरण्यासाठी घरात प्रत्येकाचा एक असा पर्सनल कंगवा असायचा. परंतु बदलत्या काळानुसार आता केस विंचरण्यासाठी आपण अनेक प्रकारचे कंगवे, हेअर ब्रश किंवा वेगवेगळ्या प्रकारांतील फणीचा वापर करतो. केसांसाठी हेअर ब्रश वापरल्याने केसांतील गुंता अतिशय सहज पद्धतीने सोडवला जातो. केसांसाठी असा लहान दातांचा हेअर ब्रश सगळ्यांकडेच असतो. हा हेअर ब्रश केसांसाठी जसा फायदेशीर आहे  तसे त्याचे तोटे देखील आहेत(How to Clean Hair Brushes the Right Way).

हेअर ब्रशने केस विंचरताना त्यात आपले अनेक केस अडकून राहतात. असे हेअर ब्रशमध्ये अडकलेले केस वेळीच काढून हेअर ब्रश स्वच्छ केला नाही तर तो खराब होतो. केस अडकून राहिलेल्या हेअर ब्रशचा असाच वापर केला तर केसांचे व स्कॅपलचे नुकसान होते. यासोबतच हा हेअर ब्रश वारंवार स्वच्छ करता येत नाही. या हेअर ब्रशमध्ये केसांसोबतच स्कॅल्प मधील घाण, धूळ, प्रदूषण असे सगळेच अडकून बसते. अशावेळी हेअर ब्रश खराब होतो आणि हा खराब हेअर ब्रश वापरल्याने केसांच्या आरोग्याचे व सौंदर्याचे नुकसान होते. यासाठी हेअर ब्रश वारंवार स्वच्छ करण्याऐवजी आपण एका सोप्या ट्रिकचा वापर करुन हा हेअर ब्रश स्वच्छ ठेवू शकतो. या ट्रिकचा वापर करुन हेअर ब्रश मध्ये केस अडकण्याची समस्या कायमसाठी दूर करु शकतो(How To Clean Hairbrushes Quick & Easy).

हेअर ब्रशमध्ये केस अडकून राहू नये म्हणून नेमके काय करावे ? 

हेअर ब्रशमध्ये केस अडकून राहू नये म्हणून आपण वेट टिश्यूचा वापर करु शकतो. वेट टिश्यू घेऊन त्याची घडी संपूर्णपणे उघडून घ्यावी. आता हा वेट टिश्यू हेअर ब्रशच्या दातांमध्ये व्यवस्थित अडकून बसेल असा ठेवावा.

केसांना मेहेंदी लावूनही सुंदर गडद रंग येत नाही? पाहा मेहेंदी भिजवण्याची योग्य पद्धत...

वेट टिश्यू हेअर ब्रशचे जिथे दात असतील त्या भागावर अंथरुन घ्यावा, नंतर दुसऱ्या फणीच्या मदतीने दाब देत हा वेट टिश्यू हेअर ब्रशच्या सपाट पृष्ठभागाला चिकटेल असा अलगद खाली न्यावा. त्यानंतर केस विंचरुन घ्यावेत.

हेवी ब्रेस्टसाईज म्हणून खूप घट्ट ब्रेसियर घालणं धोक्याचं, तब्येतीवर होतात ४ गंभीर परिणाम...

जान्हवी कपूर सांगते, आईने तिला शिकवलेला खास उपाय! चेहऱ्यावर श्रीदेवीसारखा ग्लो हवा तर...

हा उपाय केल्याने आपले केस हेअर ब्रशच्या मदतीने अतिशय व्यवस्थितरीत्या सेट केले जातील. त्याचबरोबर जर का केस गळत असतील तर ते केस हेअर ब्रशच्या पृष्ठभागावर असणाऱ्या वेट टिश्यूवर जाऊन चिकटतील. केस विंचरुन झाल्यानंतर हा वेट टिश्यू काढून फेकून द्यावा. यामुळे या हेअर ब्रशमध्ये केस अडकून राहत नाहीत याचबरोबर केस अडकून राहिले तर ते वेट टिश्यूवर अडकतात त्यामुळे ते काढणे सोपे होते. अशाप्रकारे आपण वेट टिश्यूचा वापर करुन आपला हेअर ब्रश स्वच्छ ठेवू शकता.

टॅग्स :सोशल व्हायरलब्यूटी टिप्स