बाथरूम ही आपल्या घरातली अशी एक जागा असते जी जास्तीतजास्त वेळ ओलसर राहाते. त्यामुळे मग बाथरुमच्या टाईल्स जरा जास्तच अस्वच्छ होत असतात. त्यामुळे आपण त्या वारंवार घासतो. पण तरीही घासण्यात थोडे कमी पडलो की हळूहळू टाईल्स पिवळट, काळपट दिसायला लागतात. एकदा हा रंग पक्का झाला की मग तो पटकन निघत नाही. बराच वेळ घासूनही टाईल्स काही स्वच्छ होत नाहीत. म्हणूनच आता बाथरूमच्या टाईल्स स्वच्छ करण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा (how to clean yellow stain from bathroom tiles and bathroom walls?). हा उपाय केल्याने अगदी कमीतकमी मेहनतीत बाथरुमच्या टाईल्स अगदी नव्यासारख्या लख्खं चमकतील..(Cleaning Tips For Bathroom Tiles)
बाथरुमच्या टाईल्स स्वच्छ करण्याचा उपाय
बाथरुमच्या टाईल्स स्वच्छ करण्यासाठी घरच्याघरी काय उपाय करता येऊ शकतो, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ manjumittal.homehacks या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या- पिगमेंटेशन? 'हा' जादुई स्प्रे मारा.. वय वाढलं तरी तरुणच दिसाल
हा उपाय करण्यासाठी ४ ते ५ लिंबांची सालं घ्या. थोडंसं पाणी टाकून ती मिक्सरमधून बारीक करून घ्या. त्यानंतर ते पाणी गाळून घ्या.
आता गाळून घेतलेल्या लिंबाच्या पाण्यामध्ये १ चमचा कोणतेही डिटर्जंट, अर्धा कप पाणी आणि १ ते २ चमचे व्हिनेगर टाका.
सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकत्र करून घ्या आणि मग ते स्प्रे बॉटलमध्ये भरा. हे पाणी आता बाथरुमच्या भिंतींच्या टाईल्सवर शिंपडा.
फक्त ५०० रुपयांत घ्या संक्रांतीसाठी काळ्या रंगाच्या कांजीवरम, सेक्विन साड्या... स्वस्तात मस्त पर्याय
त्यानंतर ५ ते ७ मिनिटे ते तसेच राहू द्या. त्यानंतर त्यावर ओल्या पाण्याचा शिपका मारा आणि ब्रशने थोडंसं घासून बाथरुमच्या टाईल्स स्वच्छ करून घ्या.
अतिशय जलद टाईल्स स्वच्छ झालेल्या जाणवतील. जर डाग खूपच पक्के असतील तर हाच उपाय दोन ते तीन वेळा करा.