हिवाळा आता सरत आला आहे आणि उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे हिवाळ्यासाठी कपाटातून बाहेर आलेले ब्लँकेट्स आता पुन्हा एकदा कपाटात ठेवून देण्याची वेळ आली आहे. हे ब्लॅंकेट्स एकदा कपाटात ठेवून दिले की ते थेट पुढच्या वर्षीच्या हिवाळ्यातच कपाटाच्या बाहेर येतात. म्हणूनच आता हिवाळ्यातले २- ३ महिने जवळपास रोजच वापरलेले ब्लँकेट्स स्वच्छ करून ठेवणं गरजेचं आहे. हे ब्लँकेट्स घरी धुणं महाकठीण (How To Clean Heavy Blankets Without Washing). त्यामुळे हे काम सोपं कसं करायचं आणि ड्रायक्लिनिंग करून ब्लँकेट्स कसे स्वच्छ करायचे, ते पाहा... (tricks and tips for dry cleaning blankets at home )
न धुता ब्लँकेट्स कसे स्वच्छ करायचे?
ब्लँकेट्सला ड्रायक्लिन कसं करायचं किंवा न धुता ब्लँकेट्स कसे स्वच्छ करायचे, याची पद्धत manpreetk0urr या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
Teddy Day 2024: बॉलीवूड सेलिब्रिटींचं टेडी लव्ह, बघा कोणत्या टेडीमध्ये आहे कुणाची 'जान'
यासाठी आपल्याला बेकिंग साेडा, व्हिनेगर, लिंबाचा रस, लिक्विड डिटर्जंट लागणार आहे.
सगळ्यात आधी तर आपल्याला जे ब्लँकेट स्वच्छ करायचं आहे ते एका मोकळ्या जागेवर पसरवून टाका. बेकिंग सोडा घ्या आणि ब्लँकेटवर टाका. यानंतर कपडे धुण्याचा जो ब्रश आहे त्याने ब्लँकेट घासून घ्या.
एका भांड्यात १ ग्लास पाणी घ्या. त्या पाण्यात अर्धा चमचा बेकिंग सोडा, १ चमचा व्हिनेगर, अर्ध्या लिंबाचा रस आणि कोणतंही डिशवाॅश किंवा कपडे धुण्याचं लिक्विड टाका.
फक्त १५ मिनिटांत करा मऊ- लुसलुशीत ओट्स इडली; डाळ- तांदूळ भिजविण्याची कटकटच नाही
या पाण्यात आता एक नॅपकीन बुडवा. तो व्यवस्थित पिळून घ्या आणि त्या ओलसर नॅपकिनने सगळा ब्लँकेट पुसून काढा.
हा ब्लँकेट आता एखादा दिवस उन्हात वाळायला ठेवा. ब्लँकेटला येणारा सगळा वास निघून जाईल. शिवाय जेव्हा तुम्ही तो पुन्हा पुढच्या हिवाळ्यात वापरायला काढाल, तेव्हा त्याला अजिबात कुबट वास येणार नाही. तो सुगंधी आणि फ्रेश असेल.