दुचाकी चालविणारे बहुसंख्य लोक हेल्मेट वापरतात. पण त्यापैकी खूपच कमी लोक हेल्मेटच्या स्वच्छतेकडे लक्ष देतात. हेल्मेट ही अनेकांची रोजच्या वापरातली वस्तू. आपल्या रोजच्या वापरातल्या इतर वस्तू जशा आपण स्वच्छ करतो, तसंच हेल्मेट स्वच्छ करणं, स्वच्छ ठेवणंही गरजेचंच आहे. पण बहुतांश लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. असंच अस्वच्छ हेल्मेट आपण दिवसेंदिवस वापरत राहिलो तर हळूहळू त्यातून दुर्गंधी येऊ लागते. त्याच्यात जमा झालेल्या बॅक्टेरियामुळे त्वचेला इन्फेक्शन होऊ शकतं. डोक्यात खाज येणे, खपल्या होणे, कोंडा वाढणे तसेच केस गळणे असे अनेक त्रास त्यामुळे होऊ शकतात (how to clean helmet?). म्हणूनच हेल्मेटची स्वच्छता कशी आणि केव्हा करावी ते पाहा. (2 simple remedies to remove bad smell or odour from helmet)
हेल्मेटची स्वच्छता कशी करायची?
बाजारात दोन प्रकारचे हेल्मेट मिळतात. हेल्मेटच्या आतल्या बाजुला जे मऊ उशीसारखे पॅड असतात ते काही हेल्मेटमधून बाहेर काढता येतात तर काही हेल्मेटमधून ते बाहेर काढता येत नाहीत. जर तुमच्या हेल्मेटमधून ते बाहेर काढता येत असतील तर एका बादलीमध्ये कोमट पाणी घ्या.
त्यात एखादा माईल्ड शाम्पू टाका आणि त्या शाम्पूच्या पाण्यात हेल्मेटचे पॅड अर्धा तास भिजत ठेवा. त्यानंतर दोन ते तीन वेळा पाणी बदलून पॅड स्वच्छ धुवून घ्या. कारण त्या पॅडमध्ये जर साबण राहीली तर त्यांना कडकपणा येतो. जर तुमचे पॅड हेल्मेटमधून बाहेर काढणं शक्य नसेल तर बादली किंवा टबमध्ये शाम्पूचे काेमट पाणी करा आणि त्यात अर्धा तास हेल्मेट भिजत ठेवा. त्यानंतर दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून ते उन्हात वाळत घाला.
हा उपाय देखील करून पाहा...
साधारणपणे दर दोन महिन्यातून एकदा हेल्मेट धुवावं. वारंवार धुतल्यास त्याच्यातले कुशनिंग खराब होऊ शकते.
केस गळणं १५ दिवसांतच कमी करणारी ५ योगासनं!! फक्त ५ मिनिटांचा वेळ द्या- केस गळणं बंद
म्हणूनच काही दिवसांपुर्वीच हेल्मेट धुतलं असेल तरी त्याच्यातून पुन्हा दुर्गंधी येऊ लागली असेल तर हेल्मेटच्या आतल्या भागात रात्रभर थोडा बेकिंग सोडा टाकून ठेवा. सकाळी तो झटकून टाका आणि ओलसर फडक्याने हेल्मेट धुवून घ्या. हेल्मेटमधली दुर्गंधी कमी होईल.