Join us

घरभर धूळ, कितीही साफसफाई केली तरी परत जळमटं लागतात? ४ टिप्स- झटपट स्वच्छता करण्याचे सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2025 15:01 IST

Quick home dusting hacks: How to remove dust in minutes: Easy ways to clean dust at home: Simple dusting tips for fast cleaning: How to get rid of dust quickly: 4 easy dusting hacks: Speed cleaning dust removal: आपल्या घरी देखील हीच परिस्थिती असेल तर घरातील धुळ साफ करण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा.

घर कितीही स्वच्छ केले तरी घरात काही कारणांमुळे धुळ पाहायला मिळते. यामुळे आपण अनेक आजारांना सहज बळी पडू शकतो.(Quick home dusting hacks) अनेकदा घर साफ करताना आपल्याला सर्दी-खोकला किंवा शिंका येण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. घर कितीही स्वच्छ केलं आवरलं की अस्वच्छ दिसते अशी अनेकांची तक्रार असते. (How to remove dust in minutes)घरातील कोपरे साफ करुन देखील धुळ आपल्याला पाहायला मिळते.(Easy ways to clean dust at home) आपले घर जर रस्त्यावर, बांधकामाच्या ठिकाणी किंवा गार्डनच्या बाजूने असेल तर टेबल- खुर्च्यांवर धूळ जमा होणे ही समस्या सामान्य असू शकते. गृहिणी अनेक वेळ त्यांचा घराची स्वच्छता करण्यात घालवतात.(Simple dusting tips for fast cleaning) टेबलावर साचलेली धुळ ही श्वसनाच्या समस्या निर्माण करते. त्यामुळे घरातील मंडळींना त्रास होऊ नये यासाठी महिलावर्ग वारंवार साफसफाई करत असतात.(How to get rid of dust quickly) जर आपल्या घरी देखील हीच परिस्थिती असेल तर घरातील धुळ साफ करण्यासाठी या सोप्या टिप्स फॉलो करा. (Speed cleaning dust removal)

गुढीपाडवा 2025 स्पेशल: गुढीसाठी घरच्याघरी 'अशी ' शिवा खणाची साडी, १० मिनिटांत गुढीचे वस्त्र तयार!

1. चप्पल-बूट शू रॅक 

घरामध्ये ८० टक्के धुळ ही बाहेरुन येणाऱ्या चप्पल किंवा बुटांमुळे येते. बाहेरुन घरात येताना  बाल्कनीमध्ये असलेल्या शूज रॅकमध्ये आपले बूट किंवा चप्पल ठेवण्याची सवय लावा. तसेच दाराबाहेर जाड डोअरमॅट्स लावा. ज्यामुळे बुटांवर घाण आणि धूळ जमा होण्यापासून रोखण्यास मदत होईल. या टिप्सच्या मदतीने घरातील घाण स्वच्छ करण्यास मदत होईल. 

2. घर साफ करण्याची पद्धत अनेक महिलांना घराची स्वच्छता एकदाच करायची असते. यामुळे घरातील धूळ साफ होण्याऐवजी ती अधिक वाढते. घर साफ करताना आधी एका बाजूने घर साफ करायला घ्या. ती घाण नेमकी कोणत्या दिशेला फेकायचे हे ठरवा. ज्यामुळे घरात पुन्हा धूळ येणार नाही. खोलीत उंचीवर ठेवलेल्या वस्तू सर्वात आधी साफ करा. पंखा साफ करा. खोलीतील उरलेल्या वस्तुंवरील धूळ साफ करा. 

3. धूळ झटकू नका

जेव्हा आपण घर साफ करतो तेव्हा धूळ सर्वत्र पसरते. धूळ झटकण्याऐवजी मायक्रोफायबर कापड वापरा. त्यावर पांढरा व्हिनेगर लावून धूळ साफ करा. हे धुळीचे कण चांगल्या प्रकारे पकडून घर स्वच्छ करण्यास मदत करते. 

4. व्हॅक्यूम क्लिनर

धूळ साफ करण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग व्हॅक्यूम क्लिनर. ते कापडावरील धूळ आणि घाण चांगल्याप्रकारे साफ करते. त्याच्या मदतीने घरातील पडदे, गाद्या, सोफा, टेबल आणि कोपऱ्यांवर साचलेली धूळ क्षणार्धात साफ करु शकता. 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स