तुमच्या फ्रिजमध्येसुद्धा बर्फाचा मोठा थर जमा होतो का? ही समस्या आजकाल अनेकांना उद्भवते (Home hacks). बर्फ तयार झाल्यामुळे फक्त फ्रिजरमध्ये सामान ठेवण्याची जागाच कमी होत नाही तर दरवाजा, उघडणं लावणंही कठीण होतं. अनेकदा फ्रिज याच कारणामुळे फ्रिज बंद ठेवावं लागतं. ज्यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेले इतर पदार्थ खराब होतात. फ्रिज बंद न करता बर्फ वितळवणं सोपं आहे. यासाठी तुम्हाला किचनमधल्या एका पदार्थाचा वापर करावा लागेल. सोपी ट्रिक वापरून तुम्ही फ्रिजमध्ये बर्फाचे डोंगर तयार होणं टाळू शकता. (How To Clean Ice From The Freezer)
अप्लायंसेस ऑनलाईनच्या रिपोर्टनुसार जेव्हा तुम्ही फ्रिजर उघडता तेव्हा स्वंयपाकघरातून उबदार, ओलसर हवा आत येते फ्रिज बंद झाल्यानंतर किंवा तापमान कमी झाल्यानंतर ओलावा गोठतो ज्यामुळे बर्फ जमा होतो. फ्रिज जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. फ्रिजरमधले मोठे बर्फाचे तुकडे वेगळे काढून घ्या.
मिठाचं पाणी
मीठ पाण्याच्या अणूंना वेगवेगळे करते. यामुळे बर्फ सहज वितळतो. जेव्हा आपण बर्फावर मीठ घालतो तेव्हा मीठाचं बर्फासोबत मिसळून एक द्रावण तयार होतं आणि बर्फ लवकर वितळतो. मिठाचा वापर स्वंयपाकाची चव वाढवण्यासाठी केला जातो. पण मिठाच्या मदतीनं तुम्ही बर्फ तयार होणं रोखू शकता. जर तुमच्या फ्रिजच्या दरवाजा व्यवस्थित बंद झाला नाही तर तुमच्या स्वंयपाक घरातील हवा फ्रिजरमध्ये गळती होण्याचं कारण ठरू शकते.
मिठाचा वापर कसा करावा
फ्रिजरमध्ये बर्फ जास्त जमा होऊ नये यासाठी एका भांड्यात थोडं मीठ घेऊन फ्रिजरमध्ये शिंपडा. असं केल्यानं फ्रिजरमध्ये जास्त बर्फ तयार होणार नाही. याव्यतिरिक्त फ्रिजरमध्ये बर्फ वितळवण्यासाठी तुम्ही मीठ आणि पाणी मिसळून त्याची पेस्ट बनवू शकता.
ही पेस्ट बर्फावर लावून 10 मिनिटं तसंच सोडून द्या. त्यानंतर काही वेळातच बर्फ वितळायला सुरूवात होईल. ही प्रोसेस फॉलो केल्यास काही मिनिटातंच बर्फ व्यवस्थित वितळेल. ज्यामुळे वीजबील वाचेल आणि तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही.