Lokmat Sakhi >Social Viral > इडली पात्राच्या छिद्रांमध्ये खरकटं अडकून बसतं? ३ सोप्या ट्रिक्स, इडली पात्र होईल झटपट स्वच्छ- चकाचक

इडली पात्राच्या छिद्रांमध्ये खरकटं अडकून बसतं? ३ सोप्या ट्रिक्स, इडली पात्र होईल झटपट स्वच्छ- चकाचक

Kitchen Tips: इडली पात्राच्या छिद्रांमध्ये अडकलेली घाण स्वच्छ करणं हे खूपच वेळखाऊ काम आहे. ते झटपट आणि सोप्या पद्धतीने कसं करायचं ते पाहूया (Cleaning Tips For Idli Maker Sparkling)....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2023 03:12 PM2023-11-18T15:12:33+5:302023-11-18T15:13:09+5:30

Kitchen Tips: इडली पात्राच्या छिद्रांमध्ये अडकलेली घाण स्वच्छ करणं हे खूपच वेळखाऊ काम आहे. ते झटपट आणि सोप्या पद्धतीने कसं करायचं ते पाहूया (Cleaning Tips For Idli Maker Sparkling)....

How to clean idli maker sparkling, Cleaning Tips For Idli Maker Sparkling | इडली पात्राच्या छिद्रांमध्ये खरकटं अडकून बसतं? ३ सोप्या ट्रिक्स, इडली पात्र होईल झटपट स्वच्छ- चकाचक

इडली पात्राच्या छिद्रांमध्ये खरकटं अडकून बसतं? ३ सोप्या ट्रिक्स, इडली पात्र होईल झटपट स्वच्छ- चकाचक

Highlightsइडली पात्र स्वच्छ करण्याच्या या ३ साध्या सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवा

इडली हा बहुसंख्य लोकांच्या आवडीचा पदार्थ. शिवाय पौष्टिकही असतो. त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये वारंवार इडल्या केल्या जातात. इडल्या झटपट होतात, पण त्यानंतर मात्र ते इडली पात्र स्वच्छ करणं हे खूप कठीण काम असतं. बऱ्याचदा इडली पात्रांच्या छिद्रांमध्ये खरकटं अडकून बसतं. ते वाळून कडक होतं आणि मग साफ करणं अजूनच अवघड होतं. म्हणूनच इडली पात्र स्वच्छ करण्याच्या या ३ साध्या सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवा (Cleaning Tips For Idli Maker Sparkling). वेळही जास्त लागणार नाही. शिवाय इडली पात्र अगदी स्वच्छ- चकाचक होईल (How to clean idli maker sparkling). 

 

इडली पात्र स्वच्छ करण्याचे उपाय

१. पाण्यात भिजत घाला

बऱ्याचदा आपण इडल्या करून झाल्यानंतर घाईघाईत इडली पात्र तसेच न धुता ठेवून देतो.

दिवाळीचा उरलेला फराळ वापरून करा ३ खमंग- खरपूस पदार्थ! लगेचच फस्त होईल सगळा फराळ

आपल्याला इडली पात्र धुण्यासाठी लगेचच वेळ मिळणार नसेल तर कमीतकमी ते एखाद्या मोठ्या भांड्यात पाण्यात भिजायला ठेवून द्यावे. इडली पात्र भिजवण्यासाठी गरम पाणी घेतल्यास अधिक चांगले. यामुळे इडली पात्राला चिकटलेले अन्नाचे कण वाळणार नाहीत आणि ते पटकन स्वच्छ होऊ शकेल. 

 

२. व्हिनेगर

इडली पात्राला जर अन्नाचे कण चिटकून ते कडक झाले असतील आणि चटकन निघत नसतील तर ते स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगरचा वापर करा.

नाश्त्याला करा दुधी भोपळ्याचे खमंग पॅनकेक, मुलांना डब्यात देण्यासाठीही पौष्टिक- चवदार पदार्थ 

यासाठी एक टब गरम पाण्यात अर्धी वाटी व्हिनेगर घाला. त्यात इडली पात्र भिजत ठेवा. साधारण अर्ध्या तासाने लिक्विड डिशवॉशचा उपयोग करून टुथब्रशच्या मदतीने इडलीपात्र घासून काढा. 


३. बेकिंग सोडा

व्हिनेगरप्रमाणेच बेकिंग सोड्याचा वापर करूनही इडली पात्राला चिकटलेले अन्नाचे कण काढून टाकता येतात.

हँगिंग बास्केटमध्ये लावण्यासाठी ६ सदाबहार रोपं, बघा कसं सुंदर सजेल तुमचं टेरेस गार्डन

यासाठी साधारण अर्धी बादली गरम पाणी असेल तर त्यात १ टेबलस्पून बेकिंग सोडा टाका. त्यात अर्धा तास इडलीपात्र भिजू द्या आणि नंतर घासणीने घासून स्वच्छ करा. 

 

Web Title: How to clean idli maker sparkling, Cleaning Tips For Idli Maker Sparkling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.