Join us  

तेलकट-चिकट लोखंडी तवा कितीही घासला तरी निघत नाही? हा घ्या लिंबाचा सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2022 10:03 AM

खराब झालेला लोखंडी तवा स्वच्छ करण्यासाठी (for cleaning iron tawa) दगडानं घासत बसण्याची गरज नाही. लिंबानं तेलकट-मेणचट, थर जमा झालेला, गंज लागलेला तवाही झटक्यात स्वच्छ होतो. फक्त तवा स्वच्छ करण्यासाठी लिंबू ( lemon for cleaning iron tawa) कसा वापरावा हे माहिती हवं.

ठळक मुद्देनुसत्या लिंबानंही खराब झालेला तवा स्वच्छ करता येतो. मीठ आणि लिंबू, बेकिंग सोडा आणि लिंबू वापरुन खराब झालेला तवा झटक्यात स्वच्छ करता येतो. 

पोळ्या भाकरीसाठी लोखंडी तवा वापरला जातो. तसेच थालिपीठ लावण्यासाठी, डोसे करण्यासाठी, उरलेला भात, भाजी गरम करण्यासाठी लोखंडी तव्याचाच वापर केला जातो. या अनेक कारणांमुळे लोखंडी तवा तेलकट होतो. लोखंडी तवा सतत तापवला की त्यावा थर तयार होतात. हे थर जर खरवडून काढून तवा स्वच्छ केला नाही तर पोळ्या भाकरी डागतात. पण लोखंडी तवा स्वच्छ करायचा (how to clean iron tawa)  म्हणजे दगडाने घासावा लागतो. त्यासाठी वेळ आणि मेहनत दोन्हीही लागते . त्यामुळे तवा स्वच्छ करण्याचा कंटाळा केला जातो. पण घरात लिंबू असलं तर खराब झालेला लोखंडी तवा स्वच्छ करण्यासाठी दगडानं घासत बसण्याची गरज नाही. लिंबानं तेलकट-मेणचट, थर जमा झालेला, गंज लागलेला तवाही ( lemon for cleaning iron tawa)  झटक्यात स्वच्छ होतो. फक्त तवा स्वच्छ करण्यासाठी लिंबू (how to use lemon for cleaning iron tawa) कसा वापरावा हे माहिती हवं. 

Image: Google

लिंबू आणि मीठ

खराब झालेला लोखंडी तवा स्वच्छ करण्यासाठी 1 लिंबू, 1 चमचा मीठ  आणि गरम पाणी घ्यावं.  तवा स्वच्छ करताना आधी कागदानं खराब तवा पुसून घ्यावा. मगा तव्यावर मीठ पसरवून घालावं. मीठ टाकल्यानंतर 10 मिनिटांनी लिंबू चिरुन घ्याव्ं आणि त्यानं तवा घासावा. तवा घासल्यावर गरम पाणी टाकावं. नंतर आपल्या नेहमीच्या डिशवाॅशनं तवा घासला की स्वच्छ होतो. 

लिंबू आणि बेकिंग सोडा

1 लिंबू , 1 चमचा बेकिंग सोडा आणि गरम पाणी घ्यावं. एका वाटीत बेकिंग सोडा आणि गरम पाणी घालून घट्ट पेस्ट करावी. ही पेस्ट नंतर तव्यावर लावून 10 -12 मिनिटं तवा तसाच ठेवावा.  नंतर लिंबानं तवा घासून गरम पाण्यानं धुतला की झटक्यात स्वच्छ होतो. 

लिंबू

नुसतं लिंबू वापरुनही तवा स्वच्छ करता येतो. यासाठी लिंबू कापून घ्यावा. लिंबानं तवा घासावा. नंतर आपल्या नेहमीच्या डिशवाॅशरचा उपयोग करत घासणीनं तवा घासून धुवून  घ्यावा. केवळ लिंबाच्या सहाय्यानेही तव्याचा मेणचटपणा, थर आणि गंज साफ होतो. 

Image: Google

लोखंडी तवा वापरताना.. 

1. एकाच तव्यावर पोळ्या, भाकरी बनवणं, भाज्या करणं, डोसे बनवणं असं करु नये. पोळ्या भाकरीसाठी तवा स्वतंत्र ठेवावा. 

2. तवा घासून स्वच्छ केल्यानंतर तव्यावर जास्त वेळ पाणी राहू देवू नये. तवा कपड्यानं पुसून कोरडा करावा. 

3. तव्यावर गंज लागत असल्यास तव्यावर एक थेंब तेल टाकून ते तव्याला पसरुन लावावं.

4. तवा रोज लिंबानं घासून ठेवल्यास खराब होणार नाही.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स