स्वयंपाकघरात कढईचा (Cleaning Tips) वापर दररोज होतो. कढईत अनेक पदार्थ केले जातात. कढईत तयार केलेले पदार्थ चवीला उत्कृष्ट होतात. पण पदार्थ करून झाल्यानंतर कढईत अन्न चिकटते, किंवा भाजी करपली तर कढई आणखीन खराब होते. कढईवर काळे डाळ दिसू लागतात. अनेकदा कढईत आपण पदार्थ डीप फ्राय करतो. ज्यामुळे कढई आणखी काळवंडलेली दिसू लागते. अशावेळी घासूनही कढई स्वच्छ होत नाही. किंवा त्यावरील काळपट डाग लवकर निघत नाही.
काही घरांमध्ये कढई घासण्यासाठी दगड असतो. पण त्या दगडानेही कढई म्हणावी तशी स्वच्छ होत नाही. शिवाय पाहुण्यांसमोर कढईत पदार्थ तयार करणे लाजिरवाणे वाटू शकते. जर आपल्याला मेहनत न घेता कढई स्वच्छ करायची असेल तर, काही घरगुती टिप्स फॉलो करून पाहा. यामुळे काही मिनिटात, घासताना जास्त झोर न लावता कढई स्वच्छ होईल(How To Clean Kadai – Kitchen Cleaning Hacks).
काळपट पडलेली कढई स्वच्छ करण्यासाठी टिप्स
बेकिंग सोडा
बेकिंग सोड्याचा वापर फक्त पदार्थ करण्यात येत नसून, कढई स्वच्छ करण्यासाठीही होऊ शकतो. यासाठी कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक ग्लास पाणी घाला, नंतर त्यात ३ टेबलस्पून मीठ, बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घालून मिसळा. कढई गॅसवर १० ते १५ मिनिटांसाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. पाणी कोमट झाल्यानंतर एका बाऊलमध्ये पाणी काढून घ्या. नंतर त्यात मीठ आणि बेकिंग सोडा शिंपडून लिंबाच्या सालीने कढई घासून काढा. यामुळे काळपट झालेली कढई मेहनत न घेता स्वच्छ होईल.
वय वर्षे फक्त २३ पण शाहरुखची लेक आहे कोट्यधीश! सुहाना खान आता अभिनेत्रीही होणार
राखेने करा स्वच्छ
अजूनही काही भागात भांडी राखेने घासण्यात येते. लाकडाच्या राखेने भांडी स्वच्छ निघतात, शिवाय मेहनत न घेता काळपट डाग निघून जातात. जर आपलीही कढई काळपट पडलेली असेल तर, लाकडाच्या राखेने कढई घासून काढा. कढई घासण्यासाठी आपण नारळाच्या शेंड्याचा देखील वापर करू शकता. यामुळे कढई चकाचक स्वच्छ होईल.
पगार किती तुला? गरज काय नोकरीची, असे कुणी टोमणे मारले तर काय उत्तर द्याल?
सॅण्ड पेपर
सॅण्ड पेपरच्या मदतीने आपण कढई स्वच्छ करू शकता. अनेकदा कढईच्या कडेला काळपट डाग दिसतात. या डागांमुळे कढई आणखी अस्वच्छ दिसू लागते. जर घासूनही कढई स्वच्छ होत नसेल तर, सॅण्ड पेपरचा वापर करून पाहा. कढईची आतील बाजू आपण सॅण्ड पेपरने घासून काढू शकता. यामुळे घासताना जास्त जोर न लावता कढई स्वच्छ होईल, शिवाय कढई नव्यासारखी दिसेल.