कढई, टोप किचनमधील इतर भांडी ही रोजच्या वापराला लागतातच. भाजी, आमटी किंवा काही इतर पदार्थ करायचे म्हटलं की कढईचा हमखास वापर केला जातो. स्वयंपाकघरात सर्वात जास्त वापरलं जाणारं भांडं म्हणजे कढई. ॲल्युमिनियमची असू देत किंवा लोखंडाची. साधं भाजण्याच्या कामापासून तळणीसाठी कढईचा (How do you remove hard stains from kadai?) वापर केला जातो. स्वयंपाक करताना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ केले जातात. कधी जास्त मसाल्याच्या भाज्या असतात. कधी तळण काढलं जातं. यामुळे कढयांना मसाल्याचे डाग राहातात. कढया मधून आणि बाहेरुन (best ways to clean tough burn stains from kadhai) तेलकट होतात. अशा कढया (How to Clean Burnt Kadhai) घासताना हात दुखून येतात, पण कढया काही निघत नाहीत. तेलकट, मसाल्याचे डाग (How do you clean burnt kadhai) असलेल्या कढया परत परत वापरल्यास कढयांवर आतून बाहेरुन तेलकट थर चढतो आणि तो घट्ट होतो. असं होवू नये आणि वेळच्या वेळी तेलकट काढया स्वच्छ होण्यासाठी काही सोप्या युक्त्या वापरल्यास कढयांवरचे तेलकट थर सहज निघून जातात(How To Clean Kadai – Kitchen Cleaning Hacks).
कढईचा पृष्ठभाग सतत वापरुन काळाकुट्ट, चिकट, तेलकट झाला आहे ?
१. सगळ्यांत आधी एका मोठ्या भांड्यात कढईचा संपूर्ण पृष्ठभाग बुडेल इतके पाणी घ्यावे. यासोबतच कढई संपूर्ण त्या भांड्यात राहील असे मोठे भांडे घ्यावे.
२. आता या भांड्यातील पाणी व्यवस्थित गरम करुन उकळवून घ्यावे.
३. पाणी उकळल्यानंतर त्यात प्रत्येकी २ टेबलस्पून बेकिंग सोडा, डिटर्जंट, लिक्विड डिश वॉश घालून ते पाण्यांत मिसळून घ्यावे.
४. त्यानंतर काळाकुट्ट, चिकट, तेलकट झालेला कढईचा पृष्ठभाग व्यवस्थित या पाण्यांत बुडेल अशी कढई त्या भांड्यात ठेवून द्यावी. त्यानंतर ही कढई हलू नये म्हणून त्यात काहीतरी जड वजनाचे भांडे ठेवून द्यावे.
किसणीला धार नाही, हात दुखून येतात ? १ सोपी ट्रिक, किसणी होईल नव्यासारखी धारदार...
फळं - भाज्या चिरताना चॉपिंग बोर्ड सटकतो ? ४ सोप्या टिप्स, बोर्ड राहील एकाच जागी स्थिर...
५. गरम उकळत्या पाण्यांत ही कढई १५ ते २० मिनिटे तशीच ठेवून द्यावी. नंतर गॅस बंद करून ही कढई आपण तशीच पाण्यांत रात्रभर भिजत ठेवू शकता.
६. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कढई या पाण्यातून बाहेर काढून त्याचा जळका पृष्ठभाग सुरीने किंवा काथ्याने घासून घेऊन कढईवर साचलेला काळा चिकट थर काढून घ्यावा.
७. आता ही कढई साबण किंवा लिक्विड डिश वॉश लावून परत एकदा स्वच्छ घासून धुवून घ्यावी.
कुकरची शिटी स्वच्छ कशी करायची ? काचेच्या बाटलीवरचे स्टिकर कसे काढायचे ? घ्या एकदम सोपे झटपट उपाय...
अशा प्रकारे आपण सतत वापरुन कढईचा काळाकुट्ट, चिकट, तेलकट झालेला पृष्ठभाग सोप्या पद्धतीने अगदी सहज स्वच्छ करु शकतो.