किचन स्वच्छ असले की स्वयंपाक करायला उत्साह येतो. किचनमध्ये आपण आपला दररोजचा स्वयंपाक बनवतो. किचनमध्ये देखील तितकीच धूळ, घाण अस्वछता असते. त्यामुळे किचनची स्वच्छता करणे देखील खूपच गरजेचे असते. किचन जर काही ठराविक दिवसानंतर स्वच्छ केले नाही तर स्वयंपाकघरात बनवलेल्या प्लायवूड कॅबिनेटवर काळा चिकट थर साचतो. यामुळे किचन अस्वच्छ दिसते. किचनमधील प्लायवुडच्या फर्निचरवर बुरशी आणि तेल मसाल्यांचे सहज डाग पडतात. स्वयंपाकघरातील कॅबिनेटवरील हे डाग अनेक पटींनी जास्त हट्टी व चिकट असतात कारण स्वयंपाक करताना गॅसची उष्णता आणि ओलसरपणा यामुळे किचन अस्वच्छ होते. अशा स्थितीत ती साफ करणे अवघड होऊन बसते.
किचन कॅबिनेट स्वच्छ करणे हे मोठे कठीण काम असते. या कॅबिनेटवरील हे हट्टी डाग काढणे सहज सोपे काम नसते. वेळच्यावेळी हे कॅबिनेट स्वच्छ करणे अतिशय गरजेचे असते. हे कॅबिनेट वेळच्यावेळी स्वच्छ नाही झाले तर त्यावर काळपट, चिकट थर साचतो. हा हट्टी थर वेळच्या वेळी काढला नाही तर तो तसाच चिकटून बसतो यामुळे किचनमधील कॅबिनेट अस्वच्छ दिसतात. यासाठी ते वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचे असते. किचन कॅबिनेट स्वच्छ करण्यासाठी काही सोपे उपाय लक्षात ठेवू(How to Clean Kitchen Cabinets, Including Tough Grease Stains).
किचनमधील कॅबिनेट किती वेळा स्वच्छ करावे....
स्वयंपाकघरातील कॅबिनेट नेहमी चमकदार दिसण्यासाठी, कोरड्या मायक्रोफायबर कापडाने आठवड्यातून एकदा तरी त्यांच्या पृष्ठभागावरील धूळ स्वच्छ करणे गरजेचे आहे. तसेच महिन्यातून एकदा ते आतून - बाहेरुन पूर्णपणे स्वच्छ करणे महत्वाचे आहे. असे केल्याने, कॅबिनेटवर चिकटपणाचा थर साचून राहत नाही .
फ्रिजरमध्ये खूप बर्फ साचतो, फ्रिजमधून पाणी गळू लागते ? ७ सोपे उपाय, कुलिंगही होईल चांगले...
किचनमधील कॅबिनेट स्वच्छ करण्यासाठी या वस्तूंचा असा करा वापर...
एक मोठ्या भांड्यात १ कप पाणी, १/४ कप व्हिनेगर , २ चमचे खोबरेल तेल आणि डिशवॉशिंग लिक्विडचे काही थेंब एकत्र करून चांगले मिसळा. याचे द्रावण तयार करुन घ्यावे.
पाणी पिण्याच्या बाटल्यांना कुबट वास येतोय? १ सोपा उपाय, बाटली होईल स्वच्छ-निर्जंतूक...
कॅबिनेट कसे स्वच्छ करावे...
किचनमध्ये बनवलेले प्लायवूड कॅबिनेट सोल्युशनने साफ करण्यापूर्वी आतील सर्व वस्तू काढून एकदा धूळ स्वच्छ कापडाने पुसून घ्यावी. आता तयार केलेल्या द्रावणात मायक्रोफायबर कापड किंवा स्पंज बुडवा आणि हलक्या हाताने घासून कॅबिनेट स्वच्छ करा. नंतर स्वच्छ सुती कापडाने पुसून टाका. असे केल्याने चिकटपणा तर दूर होतोच तसेच कॅबिनेटवरील सगळी धूळ निघून जाऊन नव्यासारखी चमकही येते.
एक सोपा उपाय...
एका स्प्रे बाटलीमध्ये १ चमचा बेकिंग सोडा,१ चमचा लिंबाचा रस आणि १ कप कोमट पाणी एकत्र करून द्रावण तयार करा. आता ते कॅबिनेटमध्ये सगळीकडे शिंपडून ५ ते १० मिनिटे तसेच ठेवून द्यावे. नंतर ते स्पंज किंवा ब्रशने स्वच्छ धुवा आणि स्वच्छ ओलसर कापडाने पुसून टाका. आता कॅबिनेट थोडावेळ उघडेच ठेवा जेणेकरून ते पूर्णपणे वाळून कोरडे होईल. जर आपले कॅबिनेट वारंवार घाण होत असेल तर तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोन वेळा देखील करू शकता. या उपायामुळे तुमचे जुने झालेले, चिकट थर बसलेले किचनमधील कॅबिनेट नव्यासारखे चमकदार दिसू लागेल.