Join us  

तेलाच्या डागांमुळे टाईल्स चिकट, घाण झाल्या? अर्धा लिंबू ३ प्रकारे वापरा, किचन टाईल्स चमकतील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 9:14 PM

How To Clean Kitchen Oily Tiles (Kitchen tiles kasha clean karaycha): काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही किचन स्वच्छ करू शकता. तेल, तुपाचे डाग निघून जाण्यास मदत होईल. (Diwali Special Cleaning Tips)

किचनमध्ये स्वंयपाक करतान तेल, मसाले उडून किचनच्या टाईल्स खराब होतात. रोज साफ केले तरी स्वंयपाकघरातील टाईल्सवर डाग लागतात. (Cooking Hacks) अनेकदा ब्रशनं  साफ केल्यानंतर टाईल्सवर डाग तसेच राहतात तुम्हीसुद्धा या समस्येनं त्रस्त असाल तर चिकट टाईल्स स्वच्छ करण्याच्या काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही किचन स्वच्छ करू शकता. तेल, तुपाचे डाग निघून जाण्यास मदत होईल. (How To Clean Kitchen Tiles)

लिंबू आणि ब्लीच (Lemon And Bleech)

ब्लिच आणि लिंबाचा वापर करू तुम्ही स्वंयपाकघरातील  घाणेरडे टाईल्स, फरश्या चमकवू शकता. एका वाटीत चार ते पाच चमचे ब्लीच घ्या यात समान प्रमाणा लिंबाचा रस मिसळा. नंतर हे मिश्रण एका जुन्या कापडाच्या मदतीनं टाईल्सवर लावा. पाच मिनिटं तसंच ठेवल्यानंतर टाईल्स  स्वच्छ करा, ज्यामुळे टाईल्स स्वच्छ होण्यास मदत होईल. (How To Remove Oil From Kitchen Tiles)

लिंबू आणि बेकिंग सोडा (Lemon & Baking Soda)

लिंबासोबत बेकिंग सोडा मिसळून किचनची साफसफाई करू शकता. या दोन्ही वस्तूंचे मिश्रण घाणेरड्या टाईल्स चमकवण्यास मदत करतात. या उपायानं ५ मिनिटांत सर्व जळजळ दूर होईल. हे मिश्रण तयार करण्यासाठी गरम पाण्यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि किचनच्या घाणेरड्या टाईल्सवर स्प्रे करा. पाच मिनिटांनतर टाईल्सवर लागलेली घाण साफ होईल.

लिंबू आणि गरम पाणी (lemon And Hot Water)

किचनची साफसफाई करताना साध्या पाण्याऐवजी गरम पाण्याचा वापर करायला हवा. स्वंयपाकघरात बरीच घाण असते जी साफ करण्यासाठी  तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता. खासकरून टाईल्स स्वच्छ करण्यासाठी पाण्यात लिंबाचा रस मिसळून याचा वापर करा ज्यामुळे साफ-सफाई लवकर लवकर होते.

टॅग्स :दिवाळी 2024किचन टिप्ससुंदर गृहनियोजन