किचन म्हटलं की भांडी आलीच. स्वयंपाक करताना भांड्याचा वापर होतोच (Kitchen Sink). सध्या बाजारात विविध प्रकारचे भांडी मिळतात. जेवण बनवल्यानंतर भांडी अस्वच्छ होतात. जेवण बनवत असताना भांडी करपतात, तर काही भांड्यांमधून तेलकटपणा निघत नाही (Utensils). भांडी घासण्यासाठी आपण साबण आणि स्क्रबरचा वापर करतो (Kitchen Tips). पण भांडी घासण्याच्या साबणाने देखील भांडी स्वच्छ होत नाही. किंवा भांडी घासून खराब झालेले सिंक लवकर स्वच्छ होत नाही.
जर गॅसच्या फ्लेमने काळी पडलेली भांडी स्वच्छ होत नसतील, किंवा सिंकवरील डाग काही केल्या निघत नसेल तर, एकदा गव्हाच्या पिठात शाम्पू मिसळून भांड्यांवर लावून पाहा. काही मिनिटात काळपट पडलेली भांडी नव्यासारखे दिसतील. शिवाय किचन सिंक देखील मिनिटात स्वच्छ होईल(How To Clean Kitchen Sink and Utensils).
गव्हाच्या पीठाने करा भांडी स्वच्छ
लागणारं साहित्य
गव्हाचं पीठ
दात स्वच्छ घासले तरी पिवळेच दिसतात? चमचाभर हळदीत मिसळून लावा '१' खास तेल, दात चमकतील
शाम्पू
स्क्रबर
'या' पद्धतीने करा भांडी आणि किचन सिंक स्वच्छ
सर्वप्रथम, एका प्लेटमध्ये २ चमचे गव्हाचं पीठ घ्या. त्यात एक चमचा शाम्पू घालून मिक्स करा. आता स्क्रबर मिश्रणात बुडवून भांडी आणि सिंक स्वच्छ करा. यामुळे ॲल्युमिनियमची भांडी, किचन सिंक आणि इतर धातूची भांडी चकाचक क्लिन होतील.
ना लाटणे- ना तेलाचा एक थेंब, तिप्पट फुलणारे मैद्याचे पापड करण्याची सोपी कृती; टिकतील महिनाभर
DIY क्लीनर
एक कप कोमट पाण्यात, २ चमचे मीठ आणि एक चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करा. मिश्रणात स्क्रबर बुडवा आणि भांडी घासा. यामुळे भांडी चकचकीत क्लिन होईल. मीठ आणि लिंबाच्या रसामुळे भांडी क्लिन होईल, शिवाय दुर्गंधीही दूर होईल.