Lokmat Sakhi >Social Viral > बेसिनमध्ये खरकटं अडकून सिंक ब्लॉक होतं? ५ उपाय- स्वच्छ राहील सिंक, पाणी तुंबणार नाही

बेसिनमध्ये खरकटं अडकून सिंक ब्लॉक होतं? ५ उपाय- स्वच्छ राहील सिंक, पाणी तुंबणार नाही

How to Clean Kitchen Sink Blockage : किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी तुम्ही केमिकल्सपासून तयार झालेल्या क्लिनर्सचा वापर न करता काही घरगुती उपायांचा वापर करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 02:42 PM2023-11-15T14:42:48+5:302023-11-16T16:48:44+5:30

How to Clean Kitchen Sink Blockage : किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी तुम्ही केमिकल्सपासून तयार झालेल्या क्लिनर्सचा वापर न करता काही घरगुती उपायांचा वापर करू शकता.

How to Clean Kitchen Sink Blockage : How to Clean Kitchen Sink Whta to Use For Kichen Sink Cleaning | बेसिनमध्ये खरकटं अडकून सिंक ब्लॉक होतं? ५ उपाय- स्वच्छ राहील सिंक, पाणी तुंबणार नाही

बेसिनमध्ये खरकटं अडकून सिंक ब्लॉक होतं? ५ उपाय- स्वच्छ राहील सिंक, पाणी तुंबणार नाही

घरातील सगळ्यात अस्वच्छ ठिकणांमध्ये किचन सिंक असते. किचन सिंक जर खूप खराब असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते.  दिवसभर आपण ६ ते ७ वेळा भांडी घासतो.(What to Use For Kichen Sink Cleaning) अन्नकण, कचरा, खरकटं अडकल्यामुळे किचन सिंक तुंबते. अनेकदा जाळी लावूही  सिंक ब्लॉक होते. सिंक ब्लॉक होऊ नये यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. (How to Clean Kitchen Sink Blockage)

किचन सिंकवर लागलेले डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही सोप्या घरगुती उपायांचाही वापर करू शकता.  अनेकदा किचन सिंक पांढरे पडू लागते. सिंक साफ-डिसइंफेक्टंट ठेवणं गरजेचं असतं. अन्यथा भांड्यावर जंतू येऊ लागतात. किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी तुम्ही केमिकल्सपासून तयार झालेल्या क्लिनर्सचा वापर न करता काही घरगुती उपायांचा वापर करू शकता. (How to Clean Kitchen Sink)

किचन सिंक चमकवण्यापासून डाग काढून टाकण्यापर्यंत तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता.  लिंबापासून बेकिंग सोड्यापर्यंत सर्व क्लिनिंग एजंट उत्तम काम करतील. सिंक स्वच्छ करण्याची योग्य पद्धत पाहूया. सिंक स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी भांडी बाजूला काढून घ्या कारण जर सिंकमध्ये अन्नाचे कण अडकले असतील तर ते पाण्याने स्वच्छ करावे लागतील.

चेहऱ्यावर अजिबात तेज नाहीये? शहनाज हुसैनने सांगितला खास उपाय करा-सुंदर दिसेल चेहरा

हायड्रोजन पेरोक्साईड

घाणेरडे किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी तुम्ही हायड्रोजन पेरोक्साईडचा वापर करू शकता. हे एक केमिकल्सयुक्त् सोल्यूशन डाग काढून टाकण्यास मदत करेल.  ज्यामुळे कपड्यांचा पिवळेपणा निघून जाण्यास मदत होते. एका बाऊलमध्ये ३ ते ४ चमचे बेकींग सोडा घाला. यात हायड्रोजन पेरोक्साईड मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट संपूर्ण सिंकवर घाला. ब्रशच्या मदतीने पूर्ण सिंकवर पसरवा. जवळपास ५ ते १० मिनिटांनी ब्रशच्या साहाय्याने सिंक व्यवस्थित साफ करा. गरम पाण्याने सिंक धुवून घ्या. बेकींग सोडा आणि हायड्रोजन पेरॉक्साईडने घाणेरडं किचन चमकण्यास मदत होईल.

स्टेनलेस स्टिलने किचन सिंक कसे स्वच्छ करावे

स्टेनलेस स्टिल सिंकची खासियत अशी असते की यावर डाग लागत नाहीत. किचन सिंक घाणेरडं होऊ नये यासाठी तुम्ही बोरेक्स पावडरचा वापर करू शकता. बोरेक्स पावडर क्लिनिंगसाठी उत्तम ठरते. सगळ्यात आधी सिंकवर बोरेक्स पावडर शिंपडा. बोरेक्स पावडरचा कमीत कमी एक लेअर तयार करा. त्यावर व्हिनेगर घाला. एका मोठ्या ब्रशने सिंकमध्ये पेस्ट घालून ब्रशने घासा. 

ऐन तारूण्यात केस पिकले? चमचाभर हळदीची जादू-काळे होतील केस; डाय लावणंच विसराल

किचन सिंकवरील डाग कसे काढावेत?

सगळ्यात आधी लिंबू दोन तुकड्यांमध्ये कापून घ्या. नंतर त्यावर मीठ घाला. किचन सिंकवर  थोडा बेकिंग सोडा घालून नंतर पुन्हा लिंबाच्या मदतीने सिंक घासून घ्या. सिंक कमीत कमी ५ ते ७ मिनिटं रब करा.  नंतर कोमट पाण्याने  सिंक स्वच्छ करून घ्या.

किचन सिंक खराब होऊ नये  यासाठी ४ गोष्टी लक्षात ठेवा

१) प्रत्येक वापरानंतर सिंक भांडी धुण्याच्या साबणाने स्वच्छ करा. ज्यामुळे किचन सिंक खराब होणार नाही.

२) आठवड्यातून एकदा किचन सिंक स्वच्छ करा. म्हणजेच सिंक डिप क्लिन करा. याशिवाय सिंकचा पाईपसुद्धा स्वच्छ करा.

३) सिंकमध्ये फळांची सालं आणि भाज्यांचा कचरा फेकू नका. सालं सुक्या कचऱ्यात टाका.

४) पाईप ब्लॉक होऊ नये यासाठी पाईपमध्ये गरम पाणी घालत राहा. पाणी जास्त गरम असू नये. अन्यथा पाईप फाटण्याची शक्यता असते. 

Web Title: How to Clean Kitchen Sink Blockage : How to Clean Kitchen Sink Whta to Use For Kichen Sink Cleaning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.