Join us  

किचन नॅपकिन्स धुतले तरी कळकट-कडकच राहतात? ४ टिप्स- नॅपकिन होतील स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2023 6:17 PM

how to clean kitchen towels easily स्वयंपाकघरात वापराचे नॅपकिन धुतले तरी कडक राहतात, उग्र वास येतो, ते टाळण्यासाठी खास उपाय

स्वच्छ स्वयंपाकघर कोणाला आवडत नाही. स्वयंपाकघर स्वच्छ असेल तर, घर प्रसन्न वाटते. पण बऱ्याचदा स्वयंपाकघर, ओटा साफ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कपड्याचं काय? किचन टॉवेल आपण नियमित स्वच्छ करत नाही. किचन नीट साफ होते पण, किचन टॉवेलकडे आपण दुर्लक्ष करतो. ज्यामुळे हा कापड खूप कडक, कळकट व यातून खूप दुर्गंधी पसरू लागते.

दुर्गंधीचे मुख्य कारण म्हणजे कापडामध्ये खूप बॅक्टेरिया असणे. कपड्यांमध्ये अन्नाचे कण अडकल्याने जीवाणूंची वाढ होते, ज्यामुळे ते दुर्गंधीयुक्त आणि अस्वच्छ होतात. किचन टॉवेल कितीही स्वच्छ केल्यास त्यातून दुर्गंधी निघत नाही. जर आपल्याला किचन टॉवेल स्वच्छ - दुर्गंधीमुक्त करायचं असेल तर, या काही टिप्स फॉलो करा. यामुळे किचन टॉवेल झटक्यात क्लीन होईल(how to clean kitchen towels easily).

डिटर्जंट

गलिच्छ किचन टॉवेल स्वच्छ करण्यासाठी आपण हार्ड डिटर्जंटचा वापर करू शकता. यासाठी टॉवेलला डिटर्जंट व पाण्याच्या मिश्रणात मिक्स करून काही वेळ भिजत ठेवा. यानंतर टॉवेल घासून स्वच्छ करा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. किचन टॉवेल नियमित स्वच्छ करत राहा. यामुळे तो लवकर घाण होणार नाही.

गरम पाणी

गरम पाण्याच्या वापराने टॉवेल लवकर स्वच्छ होईल. यासाठी कोमट पाण्यात थोडं डिटर्जंट मिक्स करा. यात टॉवेल काही वेळेसाठी भिजत ठेवा. १५ मिनिटे झाल्यानंतर टॉवेल स्वच्छ पाण्याने धुवा. या पद्धतीचा वापर करून आपण आठवड्यातून २ वेळा टॉवेल स्वच्छ करू शकता.

पावसाळा आला, मोबाईल फोन सांभाळा! फोन भिजला तर काळजी करू नका, तातडीने करा 5 गोष्टी

स्टेन क्लिनर

स्वयंपाकघरातील कापड स्वच्छ आणि जंतूमुक्त करण्यासाठी, आपण स्टेन क्लिनरचा वापर करू शकता. यासाठी स्टेन क्लीनरमध्ये कापड काही वेळेसाठी भिजत ठेवा. १५ मिनिटे झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने टॉवेल धुवा.

पावसाळ्यात घरात ट्यूबभोवती पाकोळ्या-किडे भिरभिरतात? ५ उपाय, किड्यांना न मारता ठेवा घराबाहेर

लिक्विड ब्लीच

किचन टॉवेल स्वच्छ आणि जंतूमुक्त करण्यासाठी लिक्वीड ब्लीचचा वापर करून पाहा. यासाठी लिक्विड ब्लीच घ्या त्यात सोडियम बायकार्बोनेट मिसळा, या मिश्रणात किचन टॉवेल काही वेळेसाठी भिजत ठेवा. १५ मिनिटानंतर पाण्याने टॉवेल धुवा. धुतल्यानंतर किचन टॉवेल नव्यासारखे दिसेल.

टॅग्स :किचन टिप्सस्वच्छता टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल