Lokmat Sakhi >Social Viral > किचन ट्रॉली साफ करण्याच्या ४ सोप्या ट्रिक्स; ट्रॉलीच्या कोपऱ्याकोपऱ्यात अडकलेली घाण होईल दूर..

किचन ट्रॉली साफ करण्याच्या ४ सोप्या ट्रिक्स; ट्रॉलीच्या कोपऱ्याकोपऱ्यात अडकलेली घाण होईल दूर..

How To Clean Kitchen Trolley Easy hacks : ट्रॉली साफ करण्यासाठी नेमकी काय युक्ती वापरायची यासाठी काही सोप्या ट्रिक्स पाहूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2023 04:40 PM2023-08-03T16:40:20+5:302023-08-03T16:54:35+5:30

How To Clean Kitchen Trolley Easy hacks : ट्रॉली साफ करण्यासाठी नेमकी काय युक्ती वापरायची यासाठी काही सोप्या ट्रिक्स पाहूया

How To Clean Kitchen Trolley Easy hacks : 4 Easy Tricks to Clean Kitchen Trolley; The dirt stuck in the corners of the trolley will be removed.. | किचन ट्रॉली साफ करण्याच्या ४ सोप्या ट्रिक्स; ट्रॉलीच्या कोपऱ्याकोपऱ्यात अडकलेली घाण होईल दूर..

किचन ट्रॉली साफ करण्याच्या ४ सोप्या ट्रिक्स; ट्रॉलीच्या कोपऱ्याकोपऱ्यात अडकलेली घाण होईल दूर..

किचन ट्रॉलीज ही किचनमधील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट. किचनमध्ये असणारी सगळी भांडी म्हणजेच किराणा सामानाचे डबे, ताटं, वाट्या, चमचे, ग्लास, कढई, पातेली अशा सगळ्या गोष्टी आपण यात ठेवतो. किचनमधील सामानाचा पसारा दिसू नये आणि सगळं व्यवस्थित राहावं यासाठी या ट्रॉलीज उपयुक्त ठरतात. आपल्या सोयीप्रमाणे आपण त्याचे कप्पे तयार करुन घेतलेले असतात. पण अनेकदा कधी डब्यातला एखादा पदार्थ सांडल्याने तर कधी झुरळांमुळे या ट्रॉलीज खराब होतात (How To Clean Kitchen Trolley Easy hacks).

काहीवेळा या ट्रॉली चांगल्या नसतील तर त्यांना गंज लागतो. कधी त्यांच्यावर तेलाचा मेंचट थर जमा होतो. यामुळे ट्रॉली अस्वच्छ होतात आणि आपल्याला नको नको होते. मात्र असे होऊ नये आणि ट्रॉली स्वच्छ राहाव्यात यासाठी आपण त्या महिन्यातून एखादवेळी पुसतोही. पण त्या म्हणाव्या तितक्या साफ होत नाहीत. मग ट्रॉली साफ करण्यासाठी नेमकी काय युक्ती वापरायची यासाठी काही सोप्या ट्रिक्स पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

१. बेकींग सोडा 

बेकींग सोडा हा स्वयंपाकात ज्याप्रमाणे महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे साफसफाईच्या बऱ्याचशा कामांमध्ये बेकींग सोड्याचा उपयोग होतो. धूळ, घाण व्यवस्थित साफ होण्यासाठी हा सोडा अतिशय उपयुक्त ठरतो. इतकेच नाही तर सोड्याच्या वापराने ट्रॉलीज खराब होण्याचीही शक्यता नसते. यासाठी एका बाऊलमध्ये ३ चमचे बेकींग सोडा आणि १ चमचा लिंबाचा रस घ्यावा. ही घट्टसर पेस्ट ट्रॉलीजवर ठिकठिकाणी लावून ठेवावी. काही वेळाने याचे बुडबुडे व्हायला लागतात. म्हणजेच पेस्ट आपले काम करत आहे. मग एका ओल्या फडक्याने ट्रॉली स्वच्छ पुसून घ्याव्यात. 

२. व्हिनेगर 

बेकींग सोड्याप्रमाणेच व्हिनेगरही साफसफाईच्या कामांसाठी अतिशय उपयुक्त असते. काही कारणाने ट्रॉलीला गंज आला असेल तर व्हिनेगरचा वापर केल्यास हा गंज निघून जाण्यास मदत होते. तसेच अनेकदा ट्रॉलीच्या कोपऱ्याकोपऱ्यात झुरळं आणि त्यांची अंडी मोठ्या प्रमाणात असतात. एका बाटलीत २५० ग्रॅम व्हिनेगर घेऊन त्यात अदाजे लिंबाचा रस घालायचा. हे मिश्रण ट्रॉलीवर स्प्रे करायचे आणि एखादा मिनीट तसेच ठेवून कपड्याने पुसून घ्यायचे. 

३. डीश सोप

डीश सोपमध्ये कोमट पाणी घालायचे आणि गॉजवर किंवा एका कापडावर हे मिश्रण घेऊन त्याने ट्रॉलीज स्वच्छ पुसून घ्यायच्या. जास्तच घाण असेल तर गॉजने घासले तरी चालेल. मात्र ट्रॉलीला कुठेही चरे पडणार नाहीत याची काळजी घ्यायची. त्यानंतर पुन्हा एकदा ओल्या कपड्याने पुसून घ्यायचे म्हणजे ट्रॉली चकचकीत दिसण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

४. अॅल्युमिनीअर फॉईल

अॅल्युमिनिअम फॉईल आपण साधारणपणे अन्नपदार्थ कॅरी करण्यासाठी किंवा गरम करण्यासाठी करतो. मात्र हा वापरलेला फॉईल कचऱ्यात न टाकता त्याचा गोळा करायचा. हा गोळा कोकाकोलामध्ये भिजवायचा आणि त्याने ट्रॉलीज घासायच्या. कोकाकोलामध्ये कार्बोनेटेड अॅसिड असते ज्यामुळे त्याचा अॅल्युमिनीअम फॉईलशी संपर्क आल्यावर त्यातून निर्माण होणारे रासायनिक घटक ट्रॉली साफ करण्यास उपयुक्त ठरतात.  

Web Title: How To Clean Kitchen Trolley Easy hacks : 4 Easy Tricks to Clean Kitchen Trolley; The dirt stuck in the corners of the trolley will be removed..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.