Join us  

स्वयंपाकघराच्या खिडक्या कितीही घासल्या तरी मेणचट? बेकिंग सोड्याचा १ सोपा उपाय; खिडकी होईल स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2024 5:33 PM

How to Clean Kitchen Window: 4 Brilliant Tips : दिवाळीनिमित्त स्वयंपाकघर स्वच्छ करताना ४ गोष्टींचा वापर करून पाहा..

साधारणपणे आपण आपलं स्वयंपाकघर (Kitchen Cleaning Tips) स्वच्छ आणि नीटनेटके ठेवतो. दिवाळी (Diwali 2024) जवळ येताच, आपण संपूर्ण घराची साफसफाई करतो (Window Cleaning Tips). मुख्यतः स्वयंपाकघराची सफाई करतो. पण नियमित न साफ केल्या जाणाऱ्या गोष्टी साफ करणं अवघड काम. कारण त्यावर चिकट - मेणचट थर जमा होतो. जे साफ करण्यात संपूर्ण दिवस जातो. ज्यात किचन खिडकीचाही समावेश आहे. स्वयंपाकघराच्या खिडकीवर दररोज वाफ, फोडणी आणि धुळीमुळे घाण अडकते आणि सहज साफ करणं सोपं नाही.

चिकट मेणचट झालेल्या खिडक्या लवकर स्वच्छ करायच्या असतील तर, फक्त साबण आणि स्क्रबरचा वापर करू नका. यासाठी काही किचनमधल्या गोष्टी वापरून पाहा. या गोष्टींमुळे मिनिटात स्वयंपाकघरातल्या खिडक्या क्लिन होतील. शिवाय जास्त मेहनतही घेण्याची गरज पडणार नाही(How to Clean Kitchen Window: 4 Brilliant Tips).

लिंबाचा रस आणि मीठ

स्वयंपाकघरातील खिडक्या स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस आणि मिठाचा वापर करून पाहा. एका बाऊलमध्ये लिंबाचा रस घ्या आणि त्यात मीठ मिक्स करा. तयार पेस्ट खिडक्यांवर लावा. काही वेळानंतर स्क्रबरने घासा. आणि पाण्याने खिडक्या धुवून घ्या. या पद्धतीने स्वच्छ केल्यास खिडक्या झटपट क्लिन होतील.

मुलं चारचौघात बोलतचं नाहीत, लाजतात? ५ गोष्टी करा; मुलं बोलतील मुद्द्याचं आत्मविश्वासाने सगळ्यांशीच

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा फक्त स्वयंपाकासाठी नसून, याचा वापर आपण स्वच्छतेसाठीही करू शकता. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये हायड्रोजन पेरॉक्साइड मिक्स करा. तयार स्प्रे खिडक्यांवर स्प्रे करा. काही वेळाने स्क्रबरने खिडक्या घासा. आणि पाण्याने धुवा.

हातापायांच्या काड्या पण पोट मात्र खूप सुटलंय? ५ सोप्या टिप्स, शरीर सुडौल -पोट होईल कमी

व्हिनेगर

व्हिनेगर फक्त स्वयंपाकात नसून, याचा वापर आपण वस्तू स्वच्छ करण्यासाठीही करू शकता. जर खिडक्या फार चिकट झाल्या असतील तर, व्हिनेगरचा वापर करून पाहा. यासाठी स्प्रे बॉटलमध्ये व्हिनेगर आणि बेकिंग सोडा घालून मिक्स करा. तयार स्प्रे खिडक्यांवर फवारा. नंतर ओल्या कापडाने खिडक्या अस्वच्छ करा. 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलदिवाळी 2024