Join us  

तेल-धुरामुळे किचनच्या खिडक्या कळकट-मेणचट झाल्या? बेकिंग सोड्याचा सोपा उपाय, खिडक्या चकाचक चमकतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2023 10:40 AM

How to Clean Kitchen Window with the help of Baking Soda : किचनच्या खिडक्या साफ करणं फार अवघड काम. त्यासाठीच बेकिंग सोड्याचा एक सोपा उपाय

सणवार सुरु झाल्यानंतर अनेक जण घराची सफाई करतात. त्यात किचनची (Kitchen Cleaning Tips) साफसफाई करताना दमछाक होते. किचन साफ करताना महिलांची विशेष तारांबळ उडते. त्यामुळे महिला किचनची सफाई शेवटी किंवा पहिले करतात. किचन साफ करताना महिला शेवटी किचनमधील खिडक्या साफ करतात. कारण किचनच्या खिडक्यांवर फोडणीचे आणि तेलाचे डाग पडतात. हे डाग सहसा लवकर निघत नाही. ग्रीस, धूळ, आणि तेलाच्या डागांमुळे खिडक्या खूपच घाण दिसू लागतात. ज्यामुळे किचनची शोभा कमी होते.

किचनच्या खिडक्या साफ करणं म्हणजे वेळखाऊ काम. जर आपल्याला देखील कमी वेळात-मेहनत न घेता, किचनच्या खिडक्या स्वच्छ करायच्या असतील तर, सोपा आणि सिंपल बेकिंग सोड्याचा वापर करून पाहा. बेकिंग सोडा फक्त जेवण करण्यासाठी वापरात येत नसून, किचनच्या अनेक वस्तू स्वच्छ करण्यासाठी वापरात येऊ शकतो(How to Clean Kitchen Window with the help of Baking Soda).

डोक्यावर सिलेंडर-पायाखाली कळशी, ही तरुण मुलगी अशी खतरनाक का नाचतेय? व्हायरल व्हिडिओ

किचनच्या खिडक्या स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर कसा करावा?

बेकिंग सोड्यातील घटक चिकटपणा काढण्यास मदत करतात. तर, लिंबूमध्ये ऍसिड असते, जे सहजपणे घाण साफ करण्यास मदत करतात. यासाठी एका वाटीत ३ ते ४ चमचे बेकिंग सोडा घ्या, त्यात लिंबाचा रस आणि पाणी मिक्स करून पेस्ट तयार करा. पेस्ट जास्त पातळ ठेऊ नका, जाडसर ठेवा, जेणेकरून खिडक्यांवरील डाग लवकर निघतील.

भाजी चिरताना चिडचिड होते, चाकूला धारच नाही? चहाच्या कपची १ सोपी ट्रिक, लावा झटपट धार

आता ही तयार पेस्ट खिडक्यांवर लावा, १५ मिनिटानंतर ब्रशने खिडक्या घासून काढा. म्हणजे खिडक्यांवरील चिकट तेलाचे डाग मेहनत न घेता निघून जातील. शेवटी स्वच्छ ओल्या कापडाने खिडकी पुसून टाका. किंवा पाण्याने धुवून काढा.

 

टॅग्स :किचन टिप्ससोशल मीडियासोशल व्हायरल