Lokmat Sakhi >Social Viral > किचन कळकट-मळकट दिसतेय? १ उपाय, किचन- सिंक-ओव्हन-ओटा पटकन होईल चकाचक...

किचन कळकट-मळकट दिसतेय? १ उपाय, किचन- सिंक-ओव्हन-ओटा पटकन होईल चकाचक...

How To Clean Kitchen With White Vinegar Cleaning Tips : किचन आणि किचनमधील वस्तू साफ होण्यासाठी १ सोपा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2023 12:42 PM2023-05-25T12:42:57+5:302023-05-26T14:57:08+5:30

How To Clean Kitchen With White Vinegar Cleaning Tips : किचन आणि किचनमधील वस्तू साफ होण्यासाठी १ सोपा उपाय...

How To Clean Kitchen With White Vinegar Cleaning Tips : Does the kitchen Dirty? 1 Remedy, Kitchen, Sink-Oven will be shiny in no time... | किचन कळकट-मळकट दिसतेय? १ उपाय, किचन- सिंक-ओव्हन-ओटा पटकन होईल चकाचक...

किचन कळकट-मळकट दिसतेय? १ उपाय, किचन- सिंक-ओव्हन-ओटा पटकन होईल चकाचक...

घरात सर्वात जास्त वापरली जाणारी खोली म्हणजे किचन. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सकाळी उठल्यापासून याठिकाणी चहा, नाश्ता, स्वयंपाक असं सतत काही ना काही सुरू असतं. घरातील प्रत्येकाच्या खाण्याच्या वेळा, आवडीनिवडी जपणारी ही खोली जास्त वापरली जात असल्याने जास्त खराबही होते. रोजच्या धावपळीत आपण ऑफीसला बाहेर पडताना किचन ओटा साफ करतो. पण तो म्हणावा तितका साफ होतोच असं नाही. मग विकेंडला आपल्याला वेगळा वेळ काढून किचनची साफसफाई करावी लागते. किचन खराब झालं की याठिकाणी झुरळं किंवा मुंग्या होतात (How To Clean Kitchen With White Vinegar Cleaning Tips). 

अनेकदा डब्यांना कसले कसले हात लागल्याने डबे खराब होतात, तर कधी हातून काही सांडल्यामुळे ट्रॉलीमध्ये घाण होते. घाईच्या वेळी आपण हे झटपट आवरतो. मात्र टाईल्सवर पडलेले डाग, डाग पडलेले शेल्फ, रोजच्या वापराने ओटा आणि सिंक खराब झालेले असते. किचन ट्रॉलिजमध्ये साठलेला कचरा, माक्रोव्हेव, मिक्सर, गॅस शेगडी अशा सगळ्याच वस्तूंवर राप चढलेला असतो. हे सगळे साफ करण्यासाठी आज आपण एक सोपा उपाय पाहणार आहोत. १ गोष्ट वापरुन आपण या सगळ्या गोष्टी झटपट साफ करु शकतो. व्हाईट विनेगर हा तो पदार्थ असून या एकाच गोष्टीने आपण किचनमधील बहुतांश सगळी साफसफाई कशी करायची ते पाहूया. 

१. जळलेली भांडी घासण्यासाठी 

चहाचे भांडे, तूपाचे भांडे किंवा आणखी काही जळालेले भांडे असेल तर ते घासणे अवघड असते. त्यावर पडलेले काळे-चॉकलेटी डाग काढण्यासाठी आपल्याला खूप जोर लावावा लागतो. अशावेळी १ कप व्हिनेगर घ्यायचे आणि त्यात २ चमचे कांद्याचा रस घालायचा. हे मिश्रण जळलेल्या भांड्यात घालायचे आणि ब्रश किंवा घासणीच्या साह्याने हे भांडे स्वच्छ घासायचे. या उपायानेही भांडे साफ झाले नाही तर पुन्हा एकदा हाच उपाय करायचा. भांडे छान चमकेल.

२. सिंक साफ करण्यासाठी 

आपण सतत हात धुण्यासाठी, भाजीपाला धुण्यासाठी आणि खरकटी भांडी धुण्यासाठी सिंकचा वापर करतो. त्यामुळे हे सिंक काही वेळाने चिकट होते. हे सिंक वेळच्या वेळी साफ केले नाही तर त्याठिकाणी खूप झुरळे, मुंग्या होतात. अशावेळी सिंक साफ करण्यासाठी त्यामध्ये भरपूर व्हाईट व्हिनेगर टाकून ठेवावे. अर्धा तास यामध्ये पाणी किंवा इतर काहीच न घालता चांगले वाळू द्यावे. त्यानंतर पाण्याने सिंक साफ केल्यास ते छान चकाकते.

(Image : Google)
(Image : Google)

३. ओव्हन साफ करताना 

ओव्हनमध्ये आपण नियमितपणे पदार्थ गरम करतो किंवा काही वेळा एखादा पदार्थ बनवतोही. त्यामुळे ओव्हनमध्ये एकप्रकारचा वास येतो. तसेच काही सांडले तर ओव्हनमध्ये चिकट डागही पडतात. हे सगळे साफ होण्यासाठी १ कप व्हाईट व्हिनेगर आणि १ कप पाणी एकत्र करावे. त्यानंतर हे भांडे ओव्हनमध्ये ठेवून ओव्हन सुरू करावा. या पाण्याच्या वाफेने ओव्हन साफ होण्यास मदत होईल. नंतर एका कोरड्या फडक्याने ओव्हन स्वच्छ पुसून घ्यावा.    

Web Title: How To Clean Kitchen With White Vinegar Cleaning Tips : Does the kitchen Dirty? 1 Remedy, Kitchen, Sink-Oven will be shiny in no time...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.