Join us  

How To Clean Laptop Screen : लॅपटॉपची नाजुक स्क्रीन पुसण्याच्या ५ सोप्या ट्रिक्स, लॅपटॉप होईल स्वच्छ- डिस्प्ले टिकेल उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2022 12:36 PM

How To Clean Laptop Screen : लॅपटॉपची स्क्रीन स्वच्छ असेल तर आपल्याला काम करायलाही चांगले वाटते. चला पाहूया स्क्रीन साफ करण्यासाठी नेमके काय करायला हवे.

ठळक मुद्देदिवसभर आपण ज्यावर काम करतो तो लॅपटॉप स्वच्छ तर असायलाच हवा नाआपण बसतो ती जागा, वस्तू स्वच्छ असतील तर काम अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते...

आपल्यातील अनेक जण दिवसातील बहुतांश वेळ लॅपटॉपवर काम करत असतात. या स्क्रीनवर अनेकदा सकले डाग पडतात किंवा भरपूर धूळ साचते. तात्पुरती एखाद्या फडक्याने ही धूळ पुसली की लॅपटॉप स्वच्छ झाला असे आपल्याला वाटते. पण प्रत्यक्षात लॅपटॉप अतिशय खराब असतो. त्याला हात लावून काम करतानाच काही वेळा आपण घाईत तसेच जेवतो. कधी डोळ्यांना हात लावतो. यामुळे ही घाण कधी आपल्या पोटात जाते तर कधी डोळ्यात. मात्र आपण दिवसभर ज्यावर काम करतो तो लॅपटॉप स्वच्छ असायला हवा. लॅपटॉपची स्क्रीन स्वच्छ असेल तर आपल्याला काम करायलाही चांगले वाटते. चला पाहूया स्क्रीन साफ करण्यासाठी नेमके काय करायला हवे.

(Image : Google)

नॉन एलईडी (ग्लास कोटेड) स्क्रीन साफ करण्यासाठी 

१. लॅपटॉप बंद करा आणि प्लगमधून पीन काढून ठेवा.

२. हलक्या मायक्रोफायबरच्या कापडाने लॅपटॉप पुसून घ्या.

३. आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर काही वेळा आपल्या हाताचे ठसे किंवा आणखी कसले डाग असतात. ते काढण्यासाठी अल्कोहोल असलेले एक लिक्वीड मिळते. ते कापडावर घेऊन त्याने स्क्रीन हळूवार पुसा. ब्लिचचा वापर करु नका.

४. काचेचा भाग आणि त्याचे कॉर्नर हळूवार पुसून घ्या. याठिकाणची आर्द्रता फडक्याला जास्त प्रणामात टिपली जाणार नाही याची काळजी घ्या.

५. यानंतर हवेनेच ही स्क्रीन कोरडी होऊ द्या.

(Image : Google)

एलसीडी किंवा एलईडी स्क्रीन कशी साफ करायची

१. लॅपटॉप बंद करा आणि प्लगमधून पीन काढून ठेवा.

२. हलक्या मायक्रोफायबरच्या कापडाने लॅपटॉप पुसून घ्या.

३. बाजारात एलसीडी डस्ट क्लीनर सहज उपलब्ध असतात. त्यातील एखादा चांगली क्लीनर खरेदी करुन तो एका सॉफ्ट फडक्यावर घेऊन त्याने स्क्रीन पुसा. अनेकदा आपण लॅपटॉपवरची धूळ काढण्यासाठी पाण्याचा वापर करतो. पण तसे करणे चुकीचे असून त्यामुळे स्क्रीन खराब होऊ शकते. 

४. स्क्रीन नीट स्वच्छ होईल असे बघा पण स्क्रीनच्या कडेने काही राहीले असेल तर हलक्या कापडाने ते साफ करा. 

५. यानंतर लॅपटॉप मोकळ्या हवेत ठेवून द्या,  

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स