Join us  

ट्रॅव्हल बॅग्जचे व्हिल्स करा चटकन स्वच्छ, हवे फक्त २ टिश्यू पेपर्स- व्हिल्स होतील चकाचक....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2024 7:06 PM

How to clean luggage bag wheels at home : HOW TO CLEAN YOUR LUGGAGE BAG WHEELS : ट्रॅव्हल बॅगेचे व्हिल्स कसे स्वच्छ करावेत याचा एक साधासोपा पर्याय...

आपल्या सगळ्यांच्याच घरात एक ट्रॅव्हल बॅग नक्कीच असते. ही ट्रॅव्हल बॅग आपण फारशी वापरत नाही म्हणून पोटमाळ्यावर किंवा कपाटांत कायमची पॅकिंग करुन ठेवतो. जेव्हा आपण कुठे बाहेर बाहेर जातो तेव्हा या ट्रॅव्हल बॅगेचा नक्की वापर करतो. प्रवासात ही ट्रॅव्हल बॅग फारच उपयोगी पडते. या बॅगेला खालच्या बाजूने व्हिल असल्याने ही बॅग आपण हातात न उचलता कुठेही ओढून घेऊन जाऊ शकतो. एवढेच नव्हे तर या बॅगेत आपण बरेचसे सामान भरुन अगदी सहजपणे कॅरी करु शकतो. बॅगेला व्हिल असल्याने बॅग हातात उचलून जड ओझं घेऊन प्रवास करण्याची गरज भासत नाही(HOW TO CLEAN YOUR LUGGAGE BAG WHEELS).

या बॅगेला असणाऱ्या व्हिलमुळे आपण कितीही सामान बॅगेत भरुन सहजपणे कुठेही प्रवास करु शकतो. प्रवास करताना आपण ही बॅग अनेक ठिकाणी आपल्यासोबत फिरवतो. आपण जिथे जिथे जातो तिथे ही बॅग आपल्यासोबतच असते. बॅगेला असणाऱ्या व्हिलमुळे आपण ती प्रवासात ओढत नेतो. ही बॅग ओढत नेताना शक्यतो या बॅगेचे व्हिल खराब होतात. बॅगेचे व्हिल रस्त्यांवरील धूळ, माती, चिखल यांच्या संपर्कात येतात. त्यामुळे ही धूळ, माती, घाण या बॅगेच्या व्हिल्सना चिकटून बसते. व्हिल्सना चिकटून बसलेली घाण, चिकल, माती वेळीच काढली नाही तर हे व्हिल्स खराब होतात. तसेच या व्हिल्सना चिकटलेली घाण, चिकल, माती काढली नाही तर ती तशीच व्हिल्सना चिकटून राहिली तर ते व्हिल्स व्यवस्थित फिरत नाहीत, परिणामी बॅग ओढताना अधिक मेहेनत घ्यावी लागते. आपण ट्रॅव्हल करून आल्यानंतर या बॅगेचे व्हिल्स स्वच्छ न करता रिकामी करून तशीच ठेवून देतो. असे न करता या ट्रॅव्हल बॅगेचे व्हिल्स कसे स्वच्छ करावेत याची एक सोपी ट्रिक पाहूयात(How to clean luggage bag wheels at home).

ट्रॅव्हल बॅगेचे व्हिल्स कसे स्वच्छ करावेत ? 

ट्रॅव्हल बॅगेचे व्हिल्स सतत धूळ, माती, चिखल यांच्या संपर्कात येतात. आपण प्रवासात बऱ्याच ठिकाणी ही बॅग फिरवतो. या व्हिल्सना लागलेली धूळ, घाण, माती यामुळे अनेक हानिकारक जिवाणू आपल्या घरात प्रवेश करु शकतात. अशावेळी प्रवास करुन आल्यानंतर या ट्रॅव्हल बॅगेचे व्हिल्स कसे स्वच्छ करावेत याची एक सोपी ट्रिक पाहुयात. 

किचनमधील काचेची भांडी फुटू नयेत म्हणून खास ७ टिप्स, क्रॉकरी टिकेल भरपूर दिवस...

ट्रॅव्हल बॅगेचे खराब झालेले अस्वच्छ व्हिल्स स्वच्छ करण्यासाठी आपल्याला फार मेहेनतीची गरज लागणार नाही. यासाठी आपल्याला फक्त दोन वेट टिश्यू पेपर लागणार आहेत. हे दोन वेट टिश्यू पेपर जमिनीवर अंथरुन ठेवावेत. आता या ओल्या टिश्यू पेपरवरुन या बॅगेचे व्हिल्स जातील असे पाहून बॅग त्या टिश्यू पेपरवरुन ३ ते ४ वेळा ओढत न्यावी. यामुळे या व्हिल्सला चिकटून बसलेली घाण, माती, चिखल  टिश्यू पेपरला पुसले जाईल, यामुळे घाणीने माखलेलं व्हिल्स अगदी सहजपणे स्वच्छ होतील. त्यानंतर हीच ट्रिक वापरून आपण पुन्हा एकदा कोरडे टिश्यू पेपर ठेवून पुन्हा तीच कृती करून घ्यावी, जेणेकरून वेट टिश्यू पेपरमुळे ओले झालेले व्हिल्स कोरडे होण्यास मदत मिळेल. ही सोपी ट्रिक वापरून आपण आपल्या ट्रॅव्हल बॅगेचे खराब झालेले व्हिल्स पटकन स्वच्छ करु शकता.

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स