Lokmat Sakhi >Social Viral > मायक्रोवेव्हची काच भुरकट झाली? २ सोपे उपाय, काच चटकन होईल स्वच्छ- चकचकीत

मायक्रोवेव्हची काच भुरकट झाली? २ सोपे उपाय, काच चटकन होईल स्वच्छ- चकचकीत

Cleaning Tips: मायक्रोवेव्हची काच बऱ्याचदा खूप भुरकट किंवा धुरकट झालेली दिसते. ती स्वच्छ चकचकीत करण्यासाठी हे काही उपाय करून बघा...(How to clean microwave glass door)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2022 06:01 PM2022-12-27T18:01:42+5:302022-12-27T18:02:25+5:30

Cleaning Tips: मायक्रोवेव्हची काच बऱ्याचदा खूप भुरकट किंवा धुरकट झालेली दिसते. ती स्वच्छ चकचकीत करण्यासाठी हे काही उपाय करून बघा...(How to clean microwave glass door)

How to clean microwave glass door? Home hacks for cleaning microwave | मायक्रोवेव्हची काच भुरकट झाली? २ सोपे उपाय, काच चटकन होईल स्वच्छ- चकचकीत

मायक्रोवेव्हची काच भुरकट झाली? २ सोपे उपाय, काच चटकन होईल स्वच्छ- चकचकीत

Highlightsअनेक जणी साबण लावून या काचा घासतात. पण त्यामुळे मायक्रोवेव्हच्या दरवाज्यावर चरे पडतात. त्यामुळेच हे काही उपाय करून बघा.

आता बहुतांश घरांमध्ये मायक्रोवेव्ह दिसून येते. रोजच्या रोज अन्न गरम करण्यासाठी त्याचा भरपूर उपयोगही होतो. पण बऱ्याचदा घाई- गडबडीत असल्याने आपल्याकडून त्याची योग्य तशी काळजी घेतली जात नाही (Home hacks for cleaning microwave). मायक्रोवेव्हमध्ये अन्नपदार्थ गरम करताना, शिजवताना त्याची वाफ त्याच्या दरवाजावर किंवा मायक्रोवेव्हच्या बेसला जी काच असते, त्यावर जमा होत जाते आणि त्यामुळे मग काही दिवसांतच या दोन्ही काचा भुरकट किंवा धुरकट दिसू लागतात..(How to clean microwave glass door?)

अशा धुरकट झालेल्या काचांमुळे मग मायक्रोवेव्ह स्वच्छ असूनही अस्वच्छ दिसू लागते. अनेक जणी साबण लावून या काचा घासतात. पण त्यामुळे मायक्रोवेव्हच्या दरवाज्यावर चरे पडतात. त्यामुळेच हे काही उपाय करून बघा.

थंडीत त्वचा कोरडी पडली? अंगावर पुरळ आली, खाज सुटली? ४ उपाय, त्वचेच्या तक्रारी कमी

उपाय सोपे आणि अगदी सहज जमण्यासारखे आहेत. शिवाय त्यासाठी खूप जास्त मेहनत घेण्याचीही गरज नाही. फक्त हे दोन्ही उपाय करण्याआधी मायक्रोवेव्हला वीज पुरविणारा मुख्य स्विच बंद करावा आणि मायक्रोवेव्ह पुसून झाल्यानंतर ते पुर्णपणे कोरडे होईपर्यंत त्याचा वापर करू नये. 

 

मायक्रोवेव्हची काच स्वच्छ करण्यासाठी उपाय
१. व्हाईट व्हिनेगर
व्हाईट व्हिनेगरचा उपयोग करून मायक्रोवेव्हची काच स्वच्छ करता येते. यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा व्हाईट व्हिनेगर घ्या.

हा डान्स आहे की व्यायाम? स्वत:च्याच लग्नात नवरीचा भलताच डान्स पाहून वऱ्हाडींना पडला प्रश्न, पाहा व्हायरल व्हिडिओ

त्यात ४ चमचे पाणी आणि लिक्विड डिशवॉशचे २ ते ३ थेंब टाका. चिमुटभर मीठ घाला. हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि एका सुती कपड्यावर टाकून त्याने अलगदपणे काचा पुसून काढा.

 

२. लिंबाचा रस
व्हिनेगर नसेल तर लिंबाच्या रसाचा वापर करूनही मायक्रोवेव्हच्या काचा स्वच्छ करता येतात.

केस गळणं कमी करणारा आयुर्वेदिक उपाय, नेहमीच्याच खोबरेल तेलात घाला २ पदार्थ आणि पाहा फरक 

त्यासाठी एका वाटीमध्ये २ ते ३ चमचे लिंबाचा रस घ्या. त्यात तेवढेच पाणी घाला. १ टीस्पून बेकींग सोडा टाका आणि हे मिश्रण एका सुती कपड्यावर घेऊन त्याने काचा स्वच्छ करा. 

 

Web Title: How to clean microwave glass door? Home hacks for cleaning microwave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.