आता बहुतांश घरांमध्ये मायक्रोवेव्ह दिसून येते. रोजच्या रोज अन्न गरम करण्यासाठी त्याचा भरपूर उपयोगही होतो. पण बऱ्याचदा घाई- गडबडीत असल्याने आपल्याकडून त्याची योग्य तशी काळजी घेतली जात नाही (Home hacks for cleaning microwave). मायक्रोवेव्हमध्ये अन्नपदार्थ गरम करताना, शिजवताना त्याची वाफ त्याच्या दरवाजावर किंवा मायक्रोवेव्हच्या बेसला जी काच असते, त्यावर जमा होत जाते आणि त्यामुळे मग काही दिवसांतच या दोन्ही काचा भुरकट किंवा धुरकट दिसू लागतात..(How to clean microwave glass door?)
अशा धुरकट झालेल्या काचांमुळे मग मायक्रोवेव्ह स्वच्छ असूनही अस्वच्छ दिसू लागते. अनेक जणी साबण लावून या काचा घासतात. पण त्यामुळे मायक्रोवेव्हच्या दरवाज्यावर चरे पडतात. त्यामुळेच हे काही उपाय करून बघा.
थंडीत त्वचा कोरडी पडली? अंगावर पुरळ आली, खाज सुटली? ४ उपाय, त्वचेच्या तक्रारी कमी
उपाय सोपे आणि अगदी सहज जमण्यासारखे आहेत. शिवाय त्यासाठी खूप जास्त मेहनत घेण्याचीही गरज नाही. फक्त हे दोन्ही उपाय करण्याआधी मायक्रोवेव्हला वीज पुरविणारा मुख्य स्विच बंद करावा आणि मायक्रोवेव्ह पुसून झाल्यानंतर ते पुर्णपणे कोरडे होईपर्यंत त्याचा वापर करू नये.
मायक्रोवेव्हची काच स्वच्छ करण्यासाठी उपाय१. व्हाईट व्हिनेगरव्हाईट व्हिनेगरचा उपयोग करून मायक्रोवेव्हची काच स्वच्छ करता येते. यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा व्हाईट व्हिनेगर घ्या.
त्यात ४ चमचे पाणी आणि लिक्विड डिशवॉशचे २ ते ३ थेंब टाका. चिमुटभर मीठ घाला. हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि एका सुती कपड्यावर टाकून त्याने अलगदपणे काचा पुसून काढा.
२. लिंबाचा रसव्हिनेगर नसेल तर लिंबाच्या रसाचा वापर करूनही मायक्रोवेव्हच्या काचा स्वच्छ करता येतात.
केस गळणं कमी करणारा आयुर्वेदिक उपाय, नेहमीच्याच खोबरेल तेलात घाला २ पदार्थ आणि पाहा फरक
त्यासाठी एका वाटीमध्ये २ ते ३ चमचे लिंबाचा रस घ्या. त्यात तेवढेच पाणी घाला. १ टीस्पून बेकींग सोडा टाका आणि हे मिश्रण एका सुती कपड्यावर घेऊन त्याने काचा स्वच्छ करा.