मिक्सर हे आपल्या अगदी रोजच्या वापरातलं उपकरणं. ते नसेल तर स्वयंपाकाचं आपलं बरंच काम अडू शकतं. बऱ्याचदा असं होतं की आपण घाई- गडबडीत मिक्सर वापरतो. त्या गोंधळात त्याच्यावर काहीतरी सांडतं, पडतं. वेळ नसल्याने आपण ते वरवर पुसतो. पण ते म्हणावं तसं स्वच्छ होत नाही. हे असंच होत राहीलं मग मग मिक्सरचा जो आतला भाग असतो, म्हणजे जिथे आपण मिक्सरचं भांडं बसवतो, तो भाग काळसर पडतो. अन्नपदार्थांचे डाग त्या भागात पडलेले दिसतात. पण ती जागा खूपच लहान असल्याने तो भाग स्वच्छ करणं जरा किचकट होऊन जातं (how to clean mixer from inside). तेच किचकट काम आता एकदम सोप्या पद्धतीने कसं करायचं ते पाहूया... (home remedies for cleaning mixer blade)
मिक्सरची फिरकी किंवा ब्लेड स्वच्छ करण्याचे उपाय
१. व्हिनेगर
काळपट, पक्के डाग स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर अतिशय उपयुक्त ठरते. हा उपाय करण्यासाठी एका भांड्यात १ चमचा व्हिनेगर घ्या. त्यामध्ये १ चमचा डिशवॉश लिक्विड आणि २ ते ३ चमचे पाणी टाका.
घामोळे आल्यामुळे खूपच त्रास होतो? यापैकी कोणताही उपाय करा, आग कमी होईल- थंड वाटेल
हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. आता मिक्सरचा आतला भाग ओलसर करून घ्या आणि त्यावर आपण तयार केलेलं मिश्रण शिंपडा. ५ ते ७ मिनिटे ते तसेच राहू द्या. त्यानंतर एखाद्या खराब टुथब्रशने ते घासून घ्या. सगळा काळपटपणा निघून जाईल.
२. टुथपेस्ट आणि बेकिंग साेडा
हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये टुथपेस्ट घ्या आणि त्यामध्ये बेकिंग सोडा टाका. आता मिक्सरची फिरकी थोडं पाणी शिंपडून ओलसर करून घ्या.
पांढऱ्या केसांना काळं करण्यासाठी वापरा 'ही' नाजूक फुलं, बघा केस रंगविण्याचा नैसर्गिक उपाय
आता टुथपेस्ट आणि बेकिंग साेड्याचे मिश्रण एखाद्या खराब टुथब्रशवर घ्या आणि त्याने मिक्सरच्या आतला भाग घासून स्वच्छ करा. मिक्सरच्या भांड्याचा आतला भाग लगेच स्वच्छ होईल.