मिक्सर ग्राईंडर किचनचा एक महत्वपूर्ण भाग आहे. आधीच्या काळी काहीही दळण्यासाठी किंवा वाटण्याासाठी खलबत्त्याचा वापर केला जायचा. (Home Hacks & Home Tips) पण आता त्याची जागी मशिनने घेतली असून त्यामुळे कामंही सोपी झाली आहेत. मिक्सर सुरक्षित ठेवण्यासाठी आणि लॉन्ट टर्म चालवण्यासाठी वेळोवेळी स्वच्छ करत राहणं गरजेचं आहे. (How to Clean Mixer Grinder Jar, Blades And Lid) काही लोक मिक्सर साफ करताना काही गोष्टींकडे लक्ष देत नाही. ग्राईंडर क्लिनिंग करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते पाहूया. (How to Clean Mixer Grinder Blades At Home)
मिक्सर ग्राईंडर स्वच्छ करण्याासठी तुम्ही लिक्वीड डिटर्जेंट, वॉशिंग पावडर, व्हिनेगर, बेकिंग पावडर, लिंबाच्या सालीचा वापर करू शकता. या उपायांनी घरच्याघरी अगदी सहज मिक्सर ग्राईंडर स्वच्छ होईल. मिक्सर ग्राईंडवर अन्नाचे कण जास्त चिकटून असतील तर साबणाचे गरम पाणी २ ते ३ तासांसाठी त्यात तसंच राहू द्या. त्यानंतर मिक्सर स्वच्छ धुवून घ्या.
मिक्सर ग्राईंडर साफ करताना या बेसिक चुका करू नका
जर मिक्सर ग्राईंडरवर चटणी किंवा मसाल्यांचे डाग लागले असतील आणि तुम्ही ते साफ करण्याच्या प्रयत्नात असाल तर सगळ्यात आधी मिक्सर अनप्लग करा. त्याशिवाय मिक्सर ग्राईंडर साफ सफाई करण्याची चूक करू नका. इलेक्ट्रिक बोर्ड अटॅच असल्यामुळे मशिमधून करंट बाहेर येऊ शकतो. ज्यामुळे धोका उद्भवतो. ज्यामुळे मशीन खराबसुद्धा होऊ शकते.
केस वर काळे आतून पांढरे झालेत? १ चुटकी हळदीने काळेभोर होतील केस, घ्या सोपा उपाय
लोखंडी किंवा टोकदार वस्तूंचा वापर करू नका
मिक्सर किंवा ग्राईंडर साफ करताना या गोष्टींची काळजी घेणं फार महत्वाचे आहे ते म्हणजे टोकदार वस्तूंचा वापर करू नका. या चुकीमुळे मिक्सर ग्राईंडरचे ब्लेड्स तुटू शकतात. म्हणून साफसफाई करताना पूर्ण सावधगिरी बाळगायला हवी.
हाताला इजा होणार नाही याची काळजी घ्या
ग्राईंडर किंवा मिक्सर साफ करताना हात सांभाळूनच काम करावे. खासकरून जार क्लिन करताना ब्लेडवर जास्त रगडू नका. हलक्या हाताने साफसफाई करा. कारण ब्लेडची धार खूपच जास्त असते. अशावेळी तुमच्या हाताला जखम होऊ शकते. स्वत:ची सेफ्टीसुद्धा महत्वाची आहे म्हणून हातात ग्लोव्हज घालून मगच साफसफाई करा.