Lokmat Sakhi >Social Viral > मिक्सर कळकट -चिकट झाला? ३ उपाय, मिक्सर दिसेल नवाकोरा चकाचक

मिक्सर कळकट -चिकट झाला? ३ उपाय, मिक्सर दिसेल नवाकोरा चकाचक

How to Clean Mixer Grinder & Jar Naturally मिक्सर साफ करण्यात खूप वेळ जातो, त्यात पाणी गेले की बिघडते, यासाठी काही टिप्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2023 04:02 PM2023-04-10T16:02:07+5:302023-04-10T16:02:58+5:30

How to Clean Mixer Grinder & Jar Naturally मिक्सर साफ करण्यात खूप वेळ जातो, त्यात पाणी गेले की बिघडते, यासाठी काही टिप्स..

How to Clean Mixer Grinder & Jar Naturally | मिक्सर कळकट -चिकट झाला? ३ उपाय, मिक्सर दिसेल नवाकोरा चकाचक

मिक्सर कळकट -चिकट झाला? ३ उपाय, मिक्सर दिसेल नवाकोरा चकाचक

गावखेड सोडलं की शहरी भागात प्रत्येकाच्या घरात मिक्सर सापडेल. चटण्या तयार करण्यापासून ते प्युरी पर्यंत, स्वयंपाकघरात मिक्सरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मिक्सरमुळे गृहिणींचे काम काही प्रमाणावर सोपे होते. जेवण बनवताना चटणी, प्युरी, पेस्ट या सगळ्या गोष्टी मिक्सरमध्ये वाटून होतात. परंतु, आपण मिक्सर रोज साफ करत नाही.

रोजच्या वापरामुळे मिक्सर अतिशय कळकट व घाण होते. मिक्सरचा वापर करत असताना त्यावर चटणीचे डाग, मसाल्यांचे डाग, पडते. ज्यामुळे हे चिकट डाग लवकर निघत नाही. व मिक्सर साफ करत असताना अधिक वेळ जातो. हे डाग काढण्यासाठी काही टिप्स फॉलो करा. या ट्रिक्समुळे मिक्सर कमी वेळात - नव्यासारखे चमकेल(How to Clean Mixer Grinder & Jar Naturally).

डिटर्जंट आणि व्हिनेगरचा वापर करा

एका वाटीत १ चमचा डिटर्जंट घ्या,  त्यात दोन चमचे व्हिनेगर घालून पेस्ट तयार करा. आता टूथब्रश किंवा सुती कापडाच्या मदतीने मिक्सर ओले करा. ब्रशवर ही पेस्ट घ्या, या पेस्टने मिक्सर घासा. थोड्या वेळा नंतर मिक्सर कोरड्या कापडाने पुसून काढा. या उपायामुळे मिक्सर नव्यासारखे चमकेल. ज्या ठिकाणी आपण मिक्सरचं भांडं ठेवतो, त्याठिकाणी ही पेस्ट लावू नये. तिथे पाणी गेल्यास मिक्सर खराब होते.

भेंडी नुडल्सनंतर आता मार्केटमध्ये आलाय 'भिंडी' समोसा, सारण म्हणून समोशात भेंडी? काय हा प्रकार..

इअरबड्सच्या मदतीने स्वच्छ करा

ज्या ठिकाणी आपण मिक्सरचं भांडं ठेवतो, ते ठिकाण साफ करण्यासाठी इअरबड्सचा वापर करा. या जागेवर अधिक घाण साचते. जर त्या ठिकाणी पाणी गेलं तर मिक्सर बिघडण्याची शक्यता वाढते. यासाठी एका वाटीत १ चमचा बेकिंग सोडा, डिश वॉश, मीठ घालून पेस्ट तयार करा. आताही पेस्ट इअरबड्सच्या मदतीने लावा व साफ करा. त्यानंतर कोरड्या कापडाने मिक्सर स्वच्छ करा.

पाणी लागल्याने खराब होतो म्हणून लायटर स्वच्छच करत नाही? ५ टिप्स-चिकट लायटर होईल चकाचक

मिक्सर ग्राइंडरचा खालील भाग साफ करण्याची सोपी पद्धत

मिक्सरचं भांडं वापरल्यानंतर, आपण भांडं स्वच्छ करतो, परंतु त्याचा मागील भाग तसाच राहून जातो. कालांतराने त्या ठिकाणी घाण साचू लागते. ही घाण साफ करण्यासाठी एका वाटीत मीठ, बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट मिक्सर ग्राइंडरच्या खालील भागात लावून ठेवा. काही वेळानंतर ब्रशच्या मदतीने घासून स्वच्छ करा. यामुळे मिक्सर ग्राइंडर स्वच्छ होईल.

Web Title: How to Clean Mixer Grinder & Jar Naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.