Lokmat Sakhi >Social Viral > मिक्सरचं भाडं मेणचट-कळकट झालंय? ४ उपाय, भांडं चमेकल नव्यासारखं, हट्टी डागही निघतील

मिक्सरचं भाडं मेणचट-कळकट झालंय? ४ उपाय, भांडं चमेकल नव्यासारखं, हट्टी डागही निघतील

How to clean mixer grinder jar stains lid rubber juicer : मिक्सर वेगानं चालवण्यासाठी आणि डाग काढून टाकण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. (How to clean mixer grinder jar stains lid rubber juicer)

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 04:38 PM2023-07-31T16:38:52+5:302023-07-31T16:56:10+5:30

How to clean mixer grinder jar stains lid rubber juicer : मिक्सर वेगानं चालवण्यासाठी आणि डाग काढून टाकण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. (How to clean mixer grinder jar stains lid rubber juicer)

How to clean mixer grinder jar stains lid rubber juicer : Easy Ways to Clean Your Mixer Grinder | मिक्सरचं भाडं मेणचट-कळकट झालंय? ४ उपाय, भांडं चमेकल नव्यासारखं, हट्टी डागही निघतील

मिक्सरचं भाडं मेणचट-कळकट झालंय? ४ उपाय, भांडं चमेकल नव्यासारखं, हट्टी डागही निघतील

स्वयंपाकघरात रोज लागणारी वस्तू म्हणजे मिक्सर. मिक्सर ग्राईंडरमुळे कामाचा वेळ वाचतो. भाज्या, गोड पदार्थ, मसाले भात कशासाठी लागणार वाटणं, पावडर लगेच तयार होते.  रोजच्या भाज्यांचे वाटण करण्यासाठी, सूप, मिल्कशेक बनवण्यासाठी, दाण्याचं कूट करण्यासाठी मिक्सर ग्राईंडर लागतंच. (Easy Ways to Clean Your Mixer Grinder )पण अनेकदा मिक्सरच्या भांड्यावर मसाल्यांचे डाग जमा होतात. त्यामुळे ही भांडी जुनाट दिसू लागतात आणि मिक्सरचा वेगही कमी होतो. मिक्सर वेगानं चालवण्यासाठी आणि डाग काढून टाकण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. (How to clean mixer grinder jar stains lid rubber juicer)

बेकींग पावडर

बेकींग पावडरचा वापर करून तुम्ही मिक्सर ग्राईंडर जार स्वच्छ करू शकता. यामुळे  वासही येणार नाही. एका भांड्यात थोडी बेकींग पावडर आणि पाणी घालून जाडसर पेस्ट तयार करा.  ही पेस्ट मिक्सर ग्राईंडर जारला बाहेरून आणि आतल्या बाजूनं  लावा. काही मिनिटांसाठी भांडे तसेच सोडून द्या. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

सॅनिटायजर

सॅनिटायजर मिक्सर ग्राईंडरचा जार स्वच्छ करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. एका बाऊलमध्ये थोडं सॅनिटायजर घ्या आणि मिक्सर जारमध्ये घालून काही मिनिटांसाठी झाकण बंद करून ठेवा. काही वेळानं त्यात थोडं पाणी घालून बटन ऑन ऑफ करा आणि ते पाणी फेकून द्या, मग साध्या पाण्यानं मिक्सरचं भाडं स्वच्छ करा. यामुळे मिक्सरच्या भांड्यातील तिखट वास दुर्गंध दूर होईल.

व्हिनेगर

मिक्सर ग्राईंडर स्वच्छ करण्यासाठी हा सोपा हॅक आहे. यासाठी तुम्हाला व्हिनेगर लागेल. पाण्यात २ मोठे चमचे व्हिनेगर मिसळा. हे मिश्रण मिक्सर जारमध्ये घाऊन काही सेकंदासाठी मिसळा. यामुळे फक्त हट्टी डाग दूर होणार नाही तर दुर्गंधसुद्धा येणार नाही. महिन्यातून २ ते ३ वेळा हा उपाय तुम्ही करू शकता.

लिंबाची सालं

लिंबाच्या साली निरुपयोगी समजून फेकून दिल्या जातात. पण याचाच वापर करून मिक्सर ग्राईडरचं जार स्वच्छ करता येऊ शकते. यासाठी सगळ्यात आधी जार स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या. आतल्या आणि बाहेरच्या बाजूला लिंबाचे साल लावून घासा. काही वेळ वाट पाहिल्यानंतर स्वच्छ पाण्यानं धुवा.

Web Title: How to clean mixer grinder jar stains lid rubber juicer : Easy Ways to Clean Your Mixer Grinder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.