किचनमध्ये रोजच्या वापरात येणारी भांडी अनेकदा काळपट आणि चिकट राहतात. तव्याच्या खालच्या बाजूला जाड लेअर तयार होते. हे साफ करणं खूप कठीण असतं. (How to Properly Maintain Your Non Stick Pans) तासनतास घासल्यानंतरही हा थर निघत नाही. भांडी खराब झाल्यामुळे हळूहळू जुनाट दिसू लागतात. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही नॉनस्टिक भांड्यांचा काळा थर काढून टाकू शकता. (How to Clean Non Stick Pan)
नॉनस्टिक पॅन कसा स्वच्छ करावा?
सगळ्यात आधी सॉस पॅन किंवा कोणत्याही प्रकारचा तवा जो तुम्हाला क्लिन करायचं असेल तो उलटा ठेवा. त्यावर अर्धा चमचा मीठ शिंपडा. त्यात अर्धा चमचा बेकिंग पावडर घाला आणि डिश वॉशर लिक्वीडवर मीठ आणि सोडा घाला स्कॉच बाईटच्या मदतीनं व्यवस्थित स्क्रब करून घ्या. (How to Clean Nonstick Pans the Safe and Easy Way) त्यानंतर ५ ते ६ टिश्यू पेपर घ्या आणि व्यवस्थित डिश कव्हर करा. टिश्यूवर पांढरे व्हिनेगर घाला आणि टिश्यूला ओले करा. १० मिनिटं तसंच राहू द्या त्यानंतर टिश्यूने पुसून घ्या.
कांदा उकळून स्वच्छ करा
एल्यूमिनियमचा जळलेला पॅन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कांद्याचा वापर करू शकता. यासाठी एका पॅनमध्ये कांदा घालून व्यवस्थित उकळून घ्या. या पाण्याने आणि भांडी धुण्याच्या पावडरने स्वच्छ धुवा. यामुळे पॅनला चमक येईल.
कांदा खाल्ला की तोंडाला वास येतो? ४ उपाय, कांदा खाल्ल्याने येणारा वास झटपट टाळा
उच्च तापमानावर अन्न शिजवू नका
जास्तीत जास्त नॉनस्टिक कुकवेअर हे मंद आणि मध्यम आचेवर उत्तम काम करतात. उच्च तापमानावर जेवण बनवल्यास पॅन वाकडा तिकडा होऊ शकतो. पॅन जास्त दिवस चांगला राहण्यासाठी मॅन्युफॅक्चर इंस्ट्रक्शन्स नक्की वाचा.
पाण्याच्या तापमानाकडे लक्ष द्या
थंड किंवा कोमट पाण्यानेच नॉन स्टिकचा पॅन साफ करा. अन्यथा पॅन वाकडा-तिकडा होऊ शकतो. बिघडलेल्या पॅनमध्ये हिट डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित होत नाही आणि जेवणही व्यवस्थित बनत नाही. नॉनस्टिक पॅन धुण्याआधी व्यवस्थित थंड करून घ्या.
घरात सतत ढेकूण होतात? ५ सोपे उपाय, एकही ढेकूण दिसणार नाही, परत होणार नाहीत...
ढवळण्यसाठी चमच्याचा वापर करू नका
नॉन स्टिक पॅनमध्ये ढवळण्यासाठी मेटल किंवा स्टिलच्या चमच्याचा वापर करू नका. लाकडी, प्लास्टीक किंवा सिलिकॉनचा चमच्याचा वापर करा.
पॅन चुकीच्या पद्धतीनं ठेवू नका
दुसऱ्या मेटलच्या भांड्यांमध्ये नॉन स्टिक पॅन ठेवू नका. यामुळे पॅनवर स्क्रॅच येण्याची भिती असते. नॉन स्टिक पॅन नेहमी वेगळा धुवा. याशिवाय नॉन स्टिक भांडी इतर भांड्यांबरोबर धुवू नका. ही भांडी नेहमी धुवून सुकवून स्वच्छ करून ठेवा.