घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच शोल्डर सॅकचा वापर करतात. तीन ते चार कप्प्यांच्या या शोल्डर बॅगेचा वापर रोज केला जातो. लहान मुलं स्कुल बॅग म्हणून तर मोठी मंडळी ऑफिस बॅग म्हणून वापरतात. रोज वापरली जाणारी ही बॅग वेळोवेळी स्वच्छ करणे देखील तितकेच गरजेचे आहे. दिवसभरात आपण या बॅगेचा कसाही वापर करतो, कुठेही ठेवतो. काहीवेळा तर या बॅगेत डबा ठेवल्याने पदार्थांतील तेल, अन्नपदार्थ बॅगेत सांडतात. अशावेळी ही बॅग खराब होते, तसेच अनेकदा या बॅगेवर धूळ, माती चिकटून बसते. यामुळे ही बॅग खराब होऊन अस्वच्छ दिसू लागते(How do you clean a bag without washing it).
शक्यतो अशा बॅगा आपण फारशा धूत नाही म्ह्णून विकत घेताना आपण मळखाऊ आणि गडद रंगाच्याच बॅगा घेतो. जेणेकरुन बॅग मळली तरी पटकन दिसून येणार नाही. याचबरोबर, ही बॅग सतत आपल्या खांद्यावर किंवा पाठीवर असते. प्रवासादरम्यान आपले खांदे आणि पाठीवर येणारा घाम या बॅगेत शोषला जाऊन काहीवेळा या बॅगेला कुबट वास येतो तसेच यामुळे बॅग खराब देखील होते. अशी ही रोजच्या वापरातली बॅग आपण फारच मळली किंवा खराब झाली तरच धुतो. पण असे न करता रोजच्या वापरातील या बॅगेची तितकीच स्वच्छता ठेवणे देखील गरजेचे आहे. ही बॅग रोजच्या वापरातली असल्याने खास सुट्टीच्या दिवशीच धुतली जाते, किंवा धुतली तरी पटकन वाळवली जाते. पण अशावेळी ही बॅग धुण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नसेल तर आपण काही सोप्या टिप्स वापरुन ही बॅग झटपट स्वच्छ करु शकतो. रोजच्या वापरातील शोल्डर सॅक स्वच्छ करण्याच्या काही झटपट ट्रिक्स(How To Clean Office Or School Bag & Remove Stain Without Washing).
शोल्डर सॅक स्वच्छ करण्यासाठी...
१. ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा :- शोल्डर बॅगेवर साचलेली धूळ, माती साफ करण्यासाठी तुम्हाला बॅग धुण्याची गरज नाही. लाँड्री ब्रशच्या मदतीने बॅग स्वच्छ करण्याचे काम सोपे होऊ शकते. यासाठी सर्वातआधी बॅग रिकामी केल्यानंतर बाहेरील आणि आतील भाग ब्रशच्या मदतीने घासून स्वच्छ करा. अशा प्रकारे, या शोल्डर सॅकवरील धूळ आणि डाग सहजपणे स्वच्छ करता येतील.
दिवाळीसाठी झटपट वाती करण्याच्या ३ ट्रिक्स, किचकट काम करा फक्त १० मिनिटांत आणि वातीही होतील सुंदर...
२. बेकिंग सोडा वापरा :- बेकिंग सोड्याच्या मदतीने देखील आपण ही शोल्डर बॅग अगदी पटकन न धुताच स्वच्छ करु शकता. या शोल्डर सॅकवरील पेनाच्या शाईचे किंवा तेलाचे तेलकट डाग बेकिंग सोड्याच्या मदतीने लगेच निघतात. यासाठी या बॅगेवरील डागांवर बेकिंग सोडा ब्रशच्या मदतीने लावून अर्धा तास तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर एखादा कॉटनचा रुमाल घेऊन तो पाण्यात भिजवून या ओल्या रुमालाने हे डाग स्वच्छ पुसून घ्यावेत. त्यानंतर ही बॅग सुकण्यासाठी थोडा वेळ ऊन्हात ठेवावी. अशाप्रकारे बेकिंग सोड्याच्या मदतीने आपण शोल्डर सॅक स्वच्छ करु शकता.
३. कुबट दुर्गंधी घालवण्यासाठी :- शोल्डर सॅक बराच काळ न धुतल्याने त्यातून कुबट दुर्गंधी येऊ शकते. ही कुबट दुर्गंधी घालवण्यासाठी आपण सॅनिटायझरचा वापर करु शकतो. यासाठी एका स्प्रे बाटलीत सॅनिटायर आणि पाणी समप्रमाणांत घेऊन त्यांचे एकत्रित द्रावण तयार करा. हे द्रावण या सॅकवर स्प्रे करून घ्यावे. त्यानंतर एका सुती कापडाने बॅग आतून - बाहेरुन स्वच्छ पुसून घ्यावी. यामुळे बॅग स्वच्छ होते तसेच सॅनिटायझरच्या वापराने बॅगेतील बॅक्टेरिया देखील मारले जातात. याचबरोबर बॅगेतील कुबट दुर्गंधी नाहीशी करण्यासाठी एका छोटाशा पाऊच किंवा प्लॅस्टिक बॅगमध्ये चमचाभर बेकिंग पावडर भरून ते पाऊच कायम बॅगेत ठेवावे.
डास चावल्याने सारखी झोपमोड होते? केळीच्या सालींचा ‘असा’ करा वापर, घरात डास दिसणार नाही...
४. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर :- या शोल्डर सॅकची वेळोवेळी स्वच्छता ठेवण्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये चमचाभर बेकिंग सोडा आणि व्हिनेगर घेऊन त्याचे एकत्रित द्रावण तयार करुन घ्यावे. आठवड्यातून एकदा संपूर्ण बॅग रिकामी करून हे तयार द्रावण आपण बॅगेवर स्प्रे करून मग सुती कापडाने बॅग स्वच्छ पुसून घ्यावी. यामुळे बॅग आठवड्यातून एकदा स्वच्छ केली जाईल.
५. डिटर्जंट :- जर आपल्याला डिप क्लिनिंग करायचे असेल तर आपण डिटर्जंट आणि पाण्याचा वापर करू शकता. पाण्यांत डिटर्जंट आणि बेकिंग सोडा घालूंन त्याचे द्रावण तयार करून घ्यावे. हे द्रावण एका मोठ्या टबमध्ये घेऊन त्यात ही शोल्डर बॅग ५ ते ७ तास किंवा रात्रभरासाठी भिजत ठेवावी, सकाळी बॅग स्वच्छ पाण्याने धुवून उन्हात वाळत घालावी.