फोडणी असो किंवा तळणीसाठी तेलाचा वापर प्रत्येक पदार्थात होतो. तेलामुळे भांड्याला पदार्थ चिटकत नाही. व चवीला देखील स्वदिष्ट होते. सध्या लोकांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यामुळे काही फिटनेस फ्रिक तेल टाळण्यास प्राधान्य देतात. विशिष्ट प्रमाणात तेलाचे प्रमाण आपल्या आहारात असायला हवे.
काही लोकं महिनाभर पुरेल इतके तेल बाजारातून आणून ठेवतात. व गरजेनुसार याचा वापर करतात. जिथे तेल आहे, तिथे चिकटपणाचा प्रश्न निर्माण होतोच. सतत तेलाच्या वापरामुळे तेलाची बाटली चिकट आणि घाण होते. त्यामुळे तेल देखील घाण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेलाच्या बाटलीला आपण वारंवार स्वच्छ करू शकत नाही. तेलाची बाटली मेहनत न घेता स्वच्छ करायची असेल तर, ही ट्रिक नक्की ट्राय करून पाहा(How to clean oil bottle | How to clean sticky oil can).
कोमट पाण्यात भिजत ठेवा बाटली
तेलाच्या बाटलीमधील तेल संपल्यानंतर त्याला स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. यासाठी कोमट पाण्यात २ चमचे बेकिंग सोडा घाला. व त्यात रिकाम्या तेलाची बाटली भिजत ठेवा. तेलामुळे झालेली चिकट बाटली मेहनत न घेता साफ होईल. जर चिकटपणा राहिला असेल तर, स्क्रबरने बाटली स्वच्छ करा. पाणी जास्त गरम नसावे, यामुळे प्लास्टिकची बाटली मेल्ट होऊ शकते.
महागड्या राख्या विकत आणल्या, आता त्यांचे काय करणार? करा ५ सुंदर गोष्टी दिसा स्टायलिश
व्हिनेगरचा करा असा वापर
व्हिनेगर डाग आणि चिकटपणा सहज काढते. हे एक नैसर्गिक क्लिंजर एजंट म्हणून काम करते. आपण व्हिनेगरचा वापर करून तेलाची बॉटल स्वच्छ करू शकता. यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये समप्रमाणात पाणी आणि व्हिनेगर घ्या. त्यात तेलाची बॉटल भिजत ठेवा. काही वेळानंतर पाण्याने बॉटल धुवून घ्या.
ना जास्त मेहनत - ना साबणाचा वापर, फक्त २ मिनिटात चहाची गाळणी साफ करण्याची भन्नाट ट्रिक
लिंबाच्या रसाने साफ करा तेलाची बॉटल
व्हिनेगर प्रमाणे लिंबू देखील एक नैसर्गिक क्लिंजर एजंट आहे. तेलाची बॉटल स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्यात लिंबाचा रस घालून मिक्स करा. त्यात आपण चिमुटभर डिटर्जंट देखील मिक्स करू शकता. या मिश्रणात तेलाची बॉटल भिजत ठेवा. काही वेळानंतर स्क्रबर किंवा ब्रशने बॉटल स्वच्छ करा.