दिवाळीत दिवे, पणत्या यांना एक प्रकारचे विशेष महत्व असते. दिवाळी ही वेगवेगळ्या प्रकारचे दिवे, मातीच्या रंगीबेरंगी पणत्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. दिवाळीत आपण घर-दार, अंगण सजवण्यासाठी दिवे, पणत्या विकत घेतो. दिवाळी वर्षातून एकदाच येणारा मोठा सण असल्याने आपण सजावट करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू एकदम एकाच वेळी विकत आणतो. दिवाळीत रांगोळी भोवती सजावट करण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या पणत्या विकत घेतो. दिवाळीत मोठ्या हौसेने आपण या पणत्या लावून घरदार, अंगण, आजूबाजूचा परिसर उजळवतो. दिवाळीचे तीन ते चार दिवसाच काय तो या पणत्यांचा आपण वापर करतो. त्यानंतर या पणत्यांच करायचं काय असा प्रश्न पडतो( How To Clean Diyas After Diwali).
काहीजण या मातीच्या पणत्या (Post Diwali Diya Cleaning Tips) फेकून देतात तर काहीजण या पुढच्या वर्षीसाठी सांभाळून ठेवून देतात. पण या अशा रोज वापरुन तेलकट झालेल्या पणत्या स्वच्छ कशा कराव्यात असा प्रश्न आपल्याला पडतो. या पणत्या आपण पुढच्या वर्षीसाठी (How To Clean Diyas After Diwali) सांभाळून जरी ठेवल्या तरी त्या स्टोअर (Diya Cleaning Ideas) करण्यापूर्वी स्वच्छ कराव्या लागतात. अशा तेल - तुपाने चिकट व उष्णतेने काळ्या पडलेल्या पणत्या कशा स्वच्छ करायच्या ते पाहूयात. दिवाळीत वापरलेल्या मातीच्या पणत्या स्टोअर करण्यापूर्वी त्यावरील तेलकट काळे डाग कसे घालावयाचे याची एक सोपी ट्रिक पाहूयात(How To Clean Oil-Ghee Diyas After Diwali).
मातीच्या पणत्या स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक...
दिवाळीचे तीन ते चार दिवस आपण मातीच्या पणत्या लावतो. या पणत्या सतत वापरुन तेलामुळे चिकट होतात. या पणत्यांवरचे तेलाचे तेलकट काळे डाग घालवण्यासाठी एक सोपा उपाय नक्की करुन पाहू शकतो. दिवाळीतील या मातीच्या पणत्या स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक alshihacks या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.
तेलकट-चिकट झालेले स्टीलचे डबे न घासता होतील चकाचक, फक्त या जादुई पाण्याचा करा वापर...
दिवाळीतील मातीच्या पणत्या स्वच्छ करण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात पाणी घेऊन ते मंद आचेवर गरम करून घ्यावे. त्यानंतर या उकळत्या गरम पाण्यात प्रत्येकी एक टेबलस्पून बेकिंग सोडा, लिक्विड डिशवॉश घालावे. चमच्याने हे द्रावण व्यवस्थित हलवून घ्यावे.
आता या गरम उकळत्या पाण्यात या मातीच्या पणत्या घालून १० ते १५ मिनिटे तशाच बुडवून ठेवून द्याव्यात. त्यानंतर चिमट्याच्या मदतीने हे दिवे गरम पाण्यातून बाहेर काढून घ्यावेत. आता नळाच्या वाहत्या पाण्याखाली या पणत्या चिमट्याने धरून स्वच्छ धुवून घ्याव्यात.
फरशीवरील लाल गेरु आणि रांगोळीचे डाग जात नाहीत? ५ ट्रिक्स, फरशी स्वच्छ होऊन दिसेल पुन्हा नव्यासारखी!
जर या मातीच्या पणत्या आतून प्लेन असतील तर त्या लगेच स्वच्छ होतात. परंतु जर या पणत्या डिजाईन्सच्या असतील तर या डिजाईन्समध्ये तेल अडकून बसते, अशावेळी या पणत्या स्वच्छ करण्यासाठी स्क्रबर किंवा लहान टूथब्रशचा वापर करावा. स्क्रबर किंवा टूथब्रश वापरुन आपण या पणत्या अगदी सहज स्वच्छ करु शकता.
या पणत्या स्वच्छ करुन झाल्यावर सुती कापडाने पुसून घ्याव्यात. त्यानंतर त्या उन्हात ठेवून व्यवस्थित सुकवून घ्याव्यात. त्यानंतर आपण या पणत्या व्यवस्थित पॅकिंग करुन स्टोअर करून ठेवू शकता.
अशाप्रकारे ही सहजसोपी ट्रिक वापरुन आपण दिवाळीतील मातीच्या पणत्या झटपट स्वच्छ करून पुढच्या वर्षीसाठी स्टोअर करून ठेवू शकतो.