Join us  

Diwali : तेलकट - मेणचट जुने दिवे कसे स्वच्छ करावे? ३ टिप्स; मिनिटांत दिवे चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2024 3:11 PM

How To Clean Oil/Ghee Diyas (Deepa)| 3 Diya Cleaning Ideas : जुने दिवाळी दिवे स्वच्छ करण्यासाठी सोप्या टिप्स

दिव्यांचा सण म्हणजेच दिवाळी (Diwali 2024). सर्वत्र रोषणाई पाहायला मिळते (Festival of Lights). दिव्यांमुळे घर देखील उजळून निघतं (Diwali Diyas). दिव्यांचा सण जवळ आला की, साफसफाई केली जाते (Cleaning Tips). फराळ केला जातो. दारोदारी दिवे लावले जातात. दिव्यांमुळे घराचा प्रत्येक कोपरा दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतो.

दिवे लवकर खराब होत नाही. एकदा वापर केल्यानंतर आपण दिवे पिशवी किंवा पेपरमध्ये गुंडाळून ठेवतो. मग पुढच्या वर्षी पुन्हा तेच दिवे वापरतो. दिवाळीच्या दिवशी जवळपास सगळेच मातीचे दिवे लावतात. जर दिवे मेणचट आणि तेलकट झाले असतील तर, ३ गोष्टींचा वापर करा. अगदी कमी वेळात मेणचट झालेले दिवे स्वच्छ होतील(How To Clean Oil/Ghee Diyas (Deepa)| 3 Diya Cleaning Ideas).

१४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलं - जिद्दीने बनली आयपीएस, पतीने साथ दिली आणि..

बेकिंग सोडा

स्वयंपाकात ते घर स्वच्छ करण्यापर्यंत बेकिंग सोड्याचा वापर होतो. घासूनही दिवे स्वच्छ होत नसतील तर, आपण बेकिंग सोड्याच्या वापराने दिवे चकचकीत स्वच्छ करू शकता.

थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा

सर्वात आधी भांड्यात १ लिटर पाणी घ्या. त्यात ३-४ चमचे बेकिंग सोडा घाला. भांडं गरम करण्यासाठी ठेवा. पाणी कोमट झाल्यानंतर गॅस बंद करा. सर्व दिवे त्यात घाला. ५ मिनिटांसाठी पाण्यात तसेच राहू द्या. ५ मिनिटांनंतर ब्रशने घासा. आणि पाण्याने धुवून घ्या. १-२ तास उन्हात वाळवत ठेवा.

डिटर्जंट पावडर

डिटर्जंट पावडरनेही आपण दिवे स्वच्छ करू शकता. यासाठी सर्वात आधी एका भांड्यात १ लिटर पाणी घ्या. त्यात ३-४ चमचे डिटर्जंट पावडर घालून मिक्स करा. त्यात दिवे ठेवा. ५-७ मिनिटांनंतर ब्रशने दिवे घासून काढा. नंतर पाण्याने दिवे स्वच्छ करू शकता.

लिंबाचा रस

लिंबाच्या रसाचा वापर करून आपण दिवाळीतील मातीचे दिवे स्वच्छ करू शकता. एका भांड्यात १-२ लिंबाचा रस घ्या. त्यात ४-५ लिंबाचा रस घालून मिक्स करा. त्यात दिवे १० मिनिटांसाठी भिजत ठेवा. १० मिनिटानंतर ब्रशने दिवे घासून घ्या. आणि पाण्याने दिवे स्वच्छ करा. 

टॅग्स :दिवाळी 2024स्वच्छता टिप्ससोशल व्हायरल