लोखंडी भांड्यात केलेला स्वयंपाक आरोग्यासाठी उत्तम आहे असं हल्ली बरेच जण सांगतात. त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये आता स्टील, ॲल्यूमिनियम, हॅण्डालूम याच्याऐवजी लोखंडाची कढई आणि लोखंडाचाच तवा दिसू लागला आहे. पण या भांड्यांचा रोज वापर करताना एकच समस्या जाणवते आणि ती म्हणजे लोखंडाची भांडी चटकन स्वच्छ होत नाहीत. जसा जसा आपण त्याचा वापर करू लागतो, तशी तशी ती जास्तच काळी पडू लागतात. काळपट झालेली भांडी स्वच्छ करायला मग खूप वेळ आणि मेहनत लागते (how to clean oily greasy iron kadai and pan?). म्हणूनच आता हा एक सोपा उपाय पाहा आणि काळवंडलेली लोखंडी कढई आणि तवा झटपट स्वच्छ करा..(simple and easy trick to clean iron kadai)
काळवंडलेली लोखंडी कढई- तवा कसा स्वच्छ करावा?
लोखंडी तवा किंवा कढई स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यात थोडं गरम पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये १ चमचा बेकिंग सोडा आणि २ चमचे व्हाईट व्हिनेगर टाका.
तरातरा मॉर्निंग वॉक तर करताय पण तज्ज्ञ सांगतात ‘या’ गोष्टी सांभाळा, नाहीतर ४ आजारांचा धोका
बेकिंग सोडा पाण्यात पुणपणे विरघळला की त्यात १ चमचा डिशवॉश लिक्विड घाला. हे सगळे पदार्थ एकदा व्यवस्थित हलवून घ्या आणि त्यामध्ये काळी पडलेली कढई किंवा तवा भिजत ठेवा.
अर्ध्या तासाने पाणी थंड झाल्यानंतर भिजत घातलेली कढई पाण्यातून काढून घ्या. त्यानंतर त्या कढईवर थोडा बेकिंग सोडा आणि डिशवॉश लिक्विड टाकून तारेच्या घासणीने त्या स्वच्छ घासून काढा.
फक्त ५ रुपयांत चेहऱ्यावरचे वांगाचे डाग निघून जातील, १ साेपा उपाय- त्वचा दिसेल स्वच्छ, चमकदार
घासून काढल्यानंतर कढई धुण्यासाठी पुन्हा थंड पाण्याऐवजी गरम पाण्याचाच वापर करा. कढईवरचे डाग बऱ्याच प्रमाणात कमी झालेले असतील. डाग खूपच पक्के असतील तर हा उपाय पुन्हा एकदा करा. कढई नव्यासारखी स्वच्छ होईल.