स्वयंपाक घरात हात पुसायला, भांडी पुसायला एक- दोन नॅपकीन ठेवलेले असतातच. आपले हात तर कधी भांडी तेलकट, मसाले लागलेली असतात. त्यामुळे मग असे हात नॅपकीनला पुसले की ते लगेच तेलकट- तुपकट होतात. त्यांना मसाल्यांचे डाग लागतात (How to remove oil stains from the napkin?). मग काही दिवसांनी हे डाग इतके पक्के होतात की नॅपकीन कितीही घासून घासून धुतले तरी डाग जात नाहीत. मग शेवटी ते नॅपकीन तसेच कळकट- मळकट दिसू लागतात. पाहुण्यांसमोर काढायला तर अगदी नकोसे हाेतात म्हणून मग आपण ते फेकून देतो (How to clean oily kitchen towel or napkin?). म्हणूनच आता हा एक सोपा उपाय पाहा आणि मळकट, तेलकट झालेले नॅपकीन चटकन, कमी मेहनतीत अगदी स्वच्छ धुवा.. (Home remedies to clean kitchen napkin)
मळकट- तेलकट नॅपकीन स्वच्छ धुण्याचे उपाय
हे काही उपाय इन्स्टाग्रामच्या thediyhack या पेजवर सुचविण्यात आले आहेत
पहिला उपाय
आता यापैकी पहिला उपाय आपण पाहूया. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर एक तवा किंवा कढई ठेवा आणि त्यात जो नॅपकीन धुवायचा आहे तो गरम करून घ्या. किंवा नॅपकीनवर तुम्ही इस्त्रीही फिरवू शकता. हे देखील नको असेल तर सरळ पाणी गरम करा आणि त्यात १० ते १५ मिनिटे नॅपकीन भिजत ठेवा
आता गरम झालेल्या नॅपकीनवर टुथपेस्ट आणि कपडे धुण्याची पावडर या दोन्ही गोष्टी सम प्रमाणात घेऊन टाका आणि नॅपकीन गरम पाण्यात २० ते २५ मिनिटे भिजत ठेवा. यानंतर ब्रशने घासून घ्या. नॅपकीनवरचे डाग निघून जातील
दुसरा उपाय
आता दुसरा उपाय करण्यासाठी आपल्याला १ टेबलस्पून टुथपेस्ट, १ टेबलस्पून कपडे धुण्याचे डिर्टजंट आणि १ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर लागणार आहे.
गरम पाण्यात हे तिन्ही पदार्थ टाका आणि त्यात नॅपकीन अर्धा तास भिजत ठेवा. त्यानंतर ब्रशने घासून स्वच्छ करा. नॅपकीन अगदी नव्यासारखा स्वच्छ होईल.